सातारा नगरपालिकेचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक ४०० कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता !

पालिका प्रशासक अभिजित बापट यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या या सभेमध्ये सातारा शहराचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक ४०० कोटी रुपयांहून अधिक असण्याची शक्यता पालिका सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.

राज्य सरकारी कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर !

राज्यातील सरकारी कर्मचारी हे त्यांच्या विविध मागण्यांसाठी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना आणि विविध शासकीय कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्या वतीने हा संप पुकारण्यात आला आहे.

गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी दुर्गप्रेमींनी एकत्र यावे ! – समस्त दुर्गप्रेमी संघटनांचे आवाहन

गड-दुर्गांच्या रक्षणासाठी हिंदूंची संघटनशक्ती दाखवण्याचा पुणे येथील बैठकीत निर्धार !

खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न करणार ! – उन्मेष पाटील, खासदार, भाजप

सुराज्य अभियानाकडून उन्मेष पाटील यांना निवेदन सादर

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जन्मस्थान भगुर (जिल्हा नाशिक) पर्यटनस्थळ म्हणून घोषित करणार ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

येत्या पंधरा दिवसांच्या आत भगुरला अधिकृतरित्या पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात येईल. येथे ‘थीम पार्क’ आणि संग्रहालयासाठी ५ कोटी रुपये देत आहोत, अशी घोषणा पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या वेळी केली.

कसबा आणि चिंचवड (पुणे) विधानसभा मतदारसंघ येथील पोटनिवडणुकीत विविध घटनांमुळे गोंधळ !

कसबा मतदारसंघ, तसेच पिंपरी-चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक २६ फेब्रुवारी या दिवशी पार पडली. या पोटनिवडणुकीत विविध घटनांमुळे राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळ उडाल्याचे चित्र होते.

कोंढवा (पुणे) येथे ३ गोवंशियांची अवैध वाहतूक करणार्‍या एका धर्मांधावर गुन्हा नोंद !

कोंढवा येथे गोवंशियांची कत्तलीसाठी अवैध वाहतूक होणार आहे, ही बातमी गोरक्षकांना मिळाली होती. त्यानुसार अक्षय कांचन आणि त्यांचे सहकारी गोरक्षक १० फेब्रुवारी या दिवशी गणेशखिंड रोड, पुणे येथे गेले असता त्यांना कत्तल करण्याच्या उद्देशाने टेंपोमध्ये एकूण ३ बैल आढळले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी लोकायुक्तांच्या विधेयकाला पाठिंबा द्यावा ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

गेल्या ७ मासांत शेतकर्‍यांच्या खात्यात १२ सहस्र कोटी रुपये दिले आहेत, तसेच सरकारने २३ सिंचन प्रकल्पांना मान्यता दिली. ५ लाख हेक्टरांहून अधिक भूमी ओलिताखाली येईल.

जिल्ह्यांची नाव पालटण्याची प्रक्रिया चालू – उपमुख्यमंत्री

आधी सामान्य प्रशासन विभाग अधिसूचना काढते. महसूल आणि वन विभाग, तसेच नगर विकास विभाग अधिसूचना जारी करेल, तेव्हा संपूर्ण जिल्ह्याचे, तालुक्याचे, महापालिका आणि नगरपालिकेचेही नाव पालटेल.

मुसलमानांच्या भावना दुखावतील म्हणून मलंगगडावर भगवा फडकवण्यासाठी जाणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांकडून नोटीस !

हिंदूंच्या धार्मिक स्थळावर अतिक्रमण करणार्‍या मुसलमानांना नव्हे, तर भगवा फडकावण्यासाठी जाणार्‍या हिंदूंना नोटीस देणारे पोलीस हिंदुत्वनिष्ठ राज्यशासनाच्या काळात असणेे अपेक्षित नाही !