पंचमहाभूत लोकोत्सवात संत-महंत यांचे मार्गदर्शन लाभणार !

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या पंचमहाभूत लोकोत्सवात महाराष्ट्र भूषण आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यासह अनेक संत-महंत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिलेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराला संभाजी ब्रिगेडचा विरोध

आदिवासींच्या उत्कर्षासाठी झटणारे, व्यसनमुक्तीसाठी कार्य करणारे ज्येष्ठ निरूपणकार पू. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित झाला आहे. यानंतर संभाजी ब्रिगेडने त्याला विरोध केला आहे.

पुणे महापालिका हद्दीतून फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही गावे वगळली !

राज्य सरकारच्या आदेशानुसार ही गावे महापालिकेतून वगळण्याचा प्रस्ताव शहर सुधारणा समिती, सर्वसाधारण सभेत मान्य करून राज्य सरकारला पाठवण्यात आल्याचे समजते.

संभाजीनगर येथे मद्यपी पोलीस उपनिरीक्षकांवर गुन्हा नोंद !

शहर पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक अनिल बोडले यांनी मद्याच्या नशेत जवाहरनगर येथील एका सोसायटीमध्ये धिंगाणा घालून महिलांसमवेत अश्लील प्रकार केला. या प्रकरणी १६ फेब्रुवारी या दिवशी येथील जवाहरनगर पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थीकलशाचे घेतले दर्शन !

दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव सुधीर फुलझेले आणि सदस्य डॉ. राजेंद्र गवई आदींनी शहा आणि फडणवीस यांचे स्वागत केले. मान्यवरांना सन्मानचिन्ह, शाल आणि ‘बुद्ध अँड हिज धम्म’ हे पुस्तक देण्यात आले.

१ लाखांची लाच स्वीकारतांना नागपूर येथे अभियंत्यासह तिघांना अटक !

शेताच्या रेखांकन संमतीच्या दृष्टीने अंतिम शिफारस पुढे पाठवण्यासाठी १ लाख १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना भंडारा येथील लाखांदुर नगरपंचायतमधील तिघांना १६ फेब्रुवारी या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.

नागपूर विमानतळावर गो एअर विमानाच्या शौचालयातून ४० लाखांचे सोने जप्त !

सीमाशुल्क विभागाच्या ‘एअर इंटेलिजन्स युनिट’ने गोपनीय माहितीच्या आधारे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याचा प्रयत्न उधळून लावला.

भाजपचे माजी नगरसेवक श्री. सुरेश (अण्णा) पाटील यांनी सभा यशस्वी होण्यासाठी केले भरीव साहाय्य !

सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १५ फेब्रुवारी या दिवशी जयभवानी प्रशालेचे मैदान येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला १८ सहस्रांहून अधिक हिंदु धर्माभिमानी उपस्थित होते.

निवडणूक आयोगाने मोठी चूक केली ! – कायदेतज्ञ उल्हास बापट

निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याअगोदर आपला निकाल द्यायला नको होता. निवडणूक आयोगाने मोठी चूक केली आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय म्हणजे राजकीय भूकंप आहे.