कर्मचार्‍यांची कसून चौकशी चालू, एकाचे निलंबन; वेतनवाढीवरही टांगती तलवार !

दीड वर्षापूर्वी येथील जिल्‍हा परिषदेत झालेल्‍या सुरक्षा ठेव घोटाळा प्रकरणी काही दोषी कर्मचार्‍यांना पदावनत करण्‍यात येणार असून काहींची वेतनवाढ थांबवण्‍यात येणार आहे. या संदर्भात आतापर्यंत एका कर्मचार्‍याचे निलंबन झाले असून घोटाळ्‍याची चौकशी चालू आहे.

मेढा (जिल्‍हा सातारा) येथे ७ सहस्रांहून अधिक हिंदूंचा ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ !

सकल हिंदु समाजाच्‍या वतीने नुकताच ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ पार पडला. ६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी ११ वाजता एस्.टी. आगार मेढा येथून मोर्च्‍यास प्रारंभ झाला. या वेळी भाजपचे आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, हिंदु राष्‍ट्र सेनेचे संस्‍थापक श्री. धनंजय देसाई, हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. भक्‍ती डाफळे आदी मान्‍यवर उपस्‍थित होते.

२७ लाख रुपये उकळणारा पोलीस उपनिरीक्षक निलंबित !

‘क्रिप्‍टो करन्‍सी’(आभासी चलन)साठी १ कोटी ८० लाख रुपये दिल्‍यावरही ती न मिळाल्‍याने त्‍याविषयी केलेल्‍या तक्रारीच्‍या अर्जावरून धमकावत २७ लाख रुपये घेणारा पोलीस उपनिरीक्षक धनाजी मारकवाड यांच्‍यावर गुन्‍हा नोंद करून त्‍यांना पोलीस आयुक्‍तांनी निलंबित केले आहे.

नागपूर येथे परिचारिकांनीच केली शासकीय रुग्‍णालयाची पोलखोल !

प्रशासनाने एका रात्रीत सिद्ध केला नवीन प्रभाग !

नागपूर येथे बसखाली चिरडून महिलेचा मृत्‍यू !

शहरातील काँग्रेसनगरकडून धंतोली पोलीस ठाण्‍याकडे जाणार्‍या मार्गाने दुचाकीवरून शीतल यादव (वय ४२ वर्षे) जात होत्‍या. त्‍या वेळी रस्‍त्‍यावर उभ्‍या असलेल्‍या मालवाहतूक पिकअप व्‍हॅनच्‍या चालकाने बाहेर न पहाता वाहनाचा दरवाजा उघडला.

भूतानच्‍या संसदीय शिष्‍टमंडळाने घेतली राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट !

भूतानच्‍या राष्‍ट्रीय संसदेचे अध्‍यक्ष वांगचुक नामग्‍येल यांनी १० संसदीय सदस्‍यांसह ९ फेब्रुवारी या दिवशी राजभवन येथे राज्‍यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांची भेट घेतली. या वेळी भूतान आणि महाराष्‍ट्र यांतील पर्यटन सहकार्य वाढवण्‍याविषयी चर्चा झाली.

हिंदूंवर झालेल्‍या अन्‍यायाविरोधात ज्‍यांना आवाज उठवायचा आहे, त्‍यांनी माझ्‍यासमवेत यावे ! – आनंद दवे, हिंदु महासंघ

कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सिद्धता चालू केली आहे. विविध संघटना, पक्ष यांच्‍या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. हिंदु महासंघाचे अध्‍यक्ष आनंद दवे यांनीही अर्ज भरला आहे. त्‍यानंतर त्‍यांनी त्‍यांची रणनीतीही सांगितली आहे.

जिल्हा प्रशासन विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी कटीबद्ध : शिवभक्तांनी करसेवा करू नये ! – राहुल रेखावार, जिल्हाधिकारी

‘‘अतिक्रमण काढण्याची प्रक्रिया चालू आहे. त्यामुळे शिवभक्तांनी महाशिवरात्रीला गालबोट लागेल अशी कोणतीही कृती करू नये.”

नाशिक येथील श्री सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी प्रति भाविक १०० रुपयांचे सशुल्क दर्शन ! – विश्वस्त मंडळाचा निर्णय

भाविकांना सर्वसामान्य दर्शन व्यवस्थाही उपलब्ध !

नाशिक येथे ९ सहस्र रुपयांची लाच घेतांना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍याला अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेला राज्य उत्पादन शुल्क विभाग !