दुसर्‍या दिवशीचे विधीमंडळाचे कामकाज विलंबाने मिळत असल्‍याची विरोधी पक्षनेत्‍यांची तक्रार !

अधिवेशनाच्‍या दुसर्‍या दिवसाचे कामकाज रात्री १२ वाजता मिळते. एवढ्या विलंबाने विषय कळल्‍यानंतर त्‍याची माहिती घेण्‍यासाठी एवढ्या रात्री कुणाला उठवायचे ? कामकाज रात्री १० वाजेपर्यंत मिळाल्‍यास त्‍यावरील उत्तरे घेता येतील, अशा शब्‍दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माहितीच्‍या सूत्राखाली…

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ घोषित करण्याची देवरुखवासियांची मागणी

या मागणीसाठी स्वाक्षर्‍यांचे निवेदन शासनापर्यंत पोचवण्यासह प्रसंगी याच चौकात आंदोलन करण्याची सिद्धताही उपस्थितांनी दर्शवली.

देशभरात एकूण ३११ नदीपट्ट्यांमध्‍ये धोकादायक प्रदूषण !

देशभरातील ३११ नद्यांतील काही पट्ट्यांमध्‍ये प्रदूषण हे धोक्‍याच्‍या पातळीवर असल्‍याचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. यामध्‍ये महाराष्‍ट्रातील ५५ नद्यांचा समावेश आहे. यामध्‍ये वाशिष्‍ठी, सावित्री आणि मुचकुंदी हे जिल्‍ह्यातील ३ नदीपट्टे प्रदूषित असल्‍याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्‍या (सीपीसीबी) अहवालातून स्‍पष्‍ट झाले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ‘हिंदुत्व’ ग्रंथाने हिंदूंमध्ये हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवण्याचे महत्कार्य केले ! – दिलीप गोखले, रा.स्व. संघ

भारत, ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे, तो म्हणजे हिंदू. केवळ भारतात जन्म झाला अथवा त्याचे आई-वडील येथे रहातात म्हणून तो हिंदु होत नाही.

राष्‍ट्रीय संत प.पू. वसंत विजय महाराज यांच्‍या जन्‍मोत्‍सवानिमित्त होणार्‍या ‘श्री कोल्‍हापूर महालक्ष्मी महोत्‍सवा’स प्रारंभ !

कृष्‍णगिरी शक्‍तीपिठाधिपती राष्‍ट्रीय संत प.पू. वसंत विजय महाराज यांच्‍या जयंतीनिमित्त सुवर्णभूमी लॉन, शिरोली पथकर नाका येथे ‘श्री कोल्‍हापूर महालक्ष्मी महोत्‍सव’ होत असून हा महोत्‍सव २६ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत होत आहे.

विरोधी पक्षाच्‍या आमदारांमध्‍ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्‍यमंत्र्यांनी खुलासा करावा ! – अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

विरोधी आमदारांमध्‍ये ‘देशद्रोही’ कोण आहे ? यावर मुख्‍यमंत्र्यांनी खुलासा करावा. मुख्‍यमंत्र्यांनी ज्‍या प्रकारची विधाने केली, त्‍यातून हे राज्‍य सरकार खरोखरच ‘महाराष्‍ट्रविरोधी’ वाटू लागले आहे, असे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्‍हटले.

विजयवाडा (आंध्रप्रदेश) येथील पुस्तक महोत्सवात सनातन संस्थेचे ग्रंथ प्रदर्शन

येथे आयोजित केलेल्या ३३ व्या पुस्तक महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने तेलुगु आणि इंग्रजी भाषेतील ग्रंथ, सात्त्विक उत्पादने अन् धर्मशिक्षण फलक यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या पुस्तक महोत्सवात २८० प्रदर्शन कक्ष लावण्यात आले होते.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेश आणि बिहार येथे पार पडले ग्रंथप्रदर्शन !

महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ९ ठिकाणी, तर बिहार येथे ४ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले.

मराठी भाषेवर प्रेम करणे, हे आपले कर्तव्‍य ! – कवी प्रा. अशोक बागवे

जसे जगण्‍यासाठी काम करणे, हे आपले कर्तव्‍य आहे, तसे मराठी ही मातृभाषा असल्‍याने आपल्‍या मराठी भाषेवर प्रेम करणे, हे आपले कर्तव्‍य आहे, असे प्रतिपादन कवी प्रा. अशोक बागवे यांनी बेलापूर येथे केले.

हिरकणी कक्षाची दुःस्‍थिती आढळल्‍याने आमदार सरोज अहिरे यांच्‍याकडून खेद व्‍यक्‍त

‘आठ दिवसांपूर्वी विधानसभा अध्‍यक्ष भेटले नसल्‍याने प्रधान सचिवांना हिरकणी कक्षाची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी पत्र दिले होते; परंतु तेथे स्‍वच्‍छता नाही. उद्यापर्यंत व्‍यवस्‍था न झाल्‍यास मला मतदारसंघात परत जावे लागेल’, असे त्‍यांनी या वेळी सांगितले.