कोल्हापूर येथे निघालेल्या शोभायात्रेत पर्यावरण रक्षणासह इतिहास, भारतीय संस्कृती, अध्यात्म, आयुर्वेद यांचा जागर !

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या ‘पंचमहाभूत लोकोत्सवा’च्या निमित्ताने शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीला गांधी मैदान ते पंचगंगा नदीघाट अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

हिंदु श्रद्धांवरील आघात थांबवण्‍यासाठी ईशनिंदाविरोधी कायदा करा !

उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे नेते स्‍वामी प्रसाद मौर्या आणि बिहारचे शिक्षणमंत्री तथा राष्‍ट्रीय जनता दलाचे नेते चंद्रशेखर यादव यांनी ‘रामचरितमानस’विषयी अत्‍यंत चुकीचे वक्‍तव्‍य केले आहे. तसेच कर्नाटकमध्‍ये के.एस्. भगवान यांनी प्रभु श्रीराम आणि सीतामाता यांच्‍याविषयी अतिशय खालच्‍या पातळीवर टीका केली.

नेपाळ हे सैद्धांतिक आणि व्यावहारिकदृष्ट्या हिंदु राष्ट्रच !

वर्ष २००८ मध्ये नेपाळला ‘धर्मनिरपेक्ष’ राष्ट्र घोषित करण्यात आले. याद्वारे येथील प्राचीन राजेशाही संपुष्टात आणण्यात आली. नेपाळमध्ये हिंदु धर्म बहुसंख्य, म्हणजे ८१ टक्क्यांहून अधिक आहेत. त्यामुळे नेपाळ हे सैद्धांतिक आणि व्यावहारिक अशा दोन्हीदृष्ट्या हिंदु राष्ट्रच आहे आणि मलाही तसेच वाटते.

धर्मांतर करण्यास नकार देणार्‍या हिंदु महिलेची मुसलमानाकडून हत्या !

अशा किती महिला जीवानिशी गेल्यावर धर्मांधांवर कारवाई केली जाणार आहे ?

‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह मिळवण्यासाठी आतापर्यंत २००० कोटी रुपयांचा व्यवहार !

‘शिवसेना भवनासह राज्यभरातील शिवसेनेच्या शाखा आमच्याकडेच रहातील. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत, निवडणूक आयोगाचा निर्णय म्हणजे शिवसेनेला संपवण्यासाठी वापरलेले तंत्र आहे’, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.

शिवसेनेच्या ट्विटर हँडलचे ‘ब्ल्यू टिक’ गेले !

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले. आता शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचे (@ShivSena) ‘ब्ल्यू टिक’ गेले असून हँडलवर क्लिक केले की, सध्या ‘रॉक अँड रोल’ असे नाव दिसत आहे.

छत्रपतींचे विचार हे स्वधर्म आणि स्वदेश यांसाठी बलीदान देणार्‍यांचे स्फूर्तीस्थान ! – अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

आज ३९६ वर्षांनंतरही छत्रपतींचे आदर्श विचार जिवंत आहेत. हे कार्य ‘दैवी’ माणसे घडवू शकतात. छत्रपती हे दैवी होते.

अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली कुणाच्या धार्मिक श्रद्धा दुखावणे अयोग्य !

रामचरितमानस जाळण्याच्या घटनेवरून अभिनेते रझा मुराद यांचे वक्तव्य !

अभिनेत्री स्वरा भास्कर आणि फहद यांचा विवाह अनधिकृत – मौलाना शहाबुद्दीन

बरेली येथील मौलाना शहाबुद्दीन म्हणाले की, ‘शरीयत-ए-एलामिया’नुसार इस्लाम न स्वीकारणार्‍या मुसलमानेतर मुलीचा मुसलमान मुलाशी विवाह अधिकृत मानला जात नाही.

देहली वक्फ बोर्डाच्या १२३ संपत्तींचे केंद्रशासन नियंत्रण मिळवणार !

काँग्रेसच्या सत्ताकाळात संपत्ती बोर्डाकडे अवैधपणे सुपुर्द करण्यात आल्या होत्या !