केंद्रीय निवडणूक आयोग विसर्जित करण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा ! – भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी देहली – मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवण्याच्या उद्धव ठाकरे यांच्या मागणीला माझा पाठिंबा आहे; कारण त्यांचा अर्थमंत्रालयातील कार्यकाळ  संशयास्पद होता, असे ट्वीट भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय घोषित केल्यावर उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग विसर्जित करण्याची आणि तेथील नियुक्त्या निवडणुकीच्या माध्यमातूनच करण्याची मागणी केली होती. त्यावर डॉ. स्वामी यांनी हे ट्वीट केले आहे. अनुप चंद्र पांडे हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत.