पंचमहाभूतांविषयी देशपातळीवर जागृती करण्याचा साधू-संतांचा निर्धार !

केवळ देशपातळीवर नाही, तर जागतिक पातळीवर पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात र्‍हास होत आहे. त्यामुळे आपण आता जागे झालो नाही, तर यापुढील काळ आणि पिढी आपल्याला क्षमा करणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘सेक्‍युलर’ दाखवण्‍याचा प्रयत्न केला जात आहे ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

‘लव्‍ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, वक्‍फ बोर्डाला दिलेली अमर्याद सवलत, हलाल जिहाद अशा समस्‍या संपवण्‍यासाठी पुन्‍हा हिंदु राष्‍ट्रच आवश्‍यक असून त्‍यासाठी सर्वांनी वेळ देणे आवश्‍यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे कोल्‍हापूर जिल्‍हा समन्‍वयक श्री. किरण दुसे यांनी केले.

पुणे येथील थोर संत प.पू. श्रीकृष्‍ण कर्वेगुरुजी यांचा देहत्‍याग !

धार्मिक आणि ज्‍योतिषतज्ञ प.पू. श्रीकृष्‍ण कर्वेगुरुजी यांनी २२ फेब्रुवारीच्‍या मध्‍यरात्री २ वाजता वयाच्‍या ९६ व्‍या वर्षी देहत्‍याग केला. तळेगाव दाभाडे येथील निवासस्‍थानी त्‍यांची प्राणज्‍योत मालवली.

राज्‍यपालांची कृती पक्षपाती असल्‍याचा ठाकरे गटाचा सर्वोच्‍च न्‍यायालयात युक्‍तीवाद !

एकनाथ शिंदे नव्‍याने निवडून आले नव्‍हते. त्‍यामुळे त्‍यांच्‍याविषयी निर्णय घेण्‍याचा अधिकार उद्धव ठाकरे यांना होता. त्‍यांनी शिंदे यांना अनुमती दिली नसतांना राज्‍यपालांनी एकनाथ शिंदे यांना मुख्‍यमंत्रीपदाची शपथ कशी दिली ?

चंद्रपूर येथील जिल्‍हाधिकारी विनय गौडा यांना अटक करण्‍याचे आदेश !

पूर्वीच्‍या माणिकगड आणि आताच्‍या अल्‍ट्राटेक सिमेंट उद्योग समुहाने कुसुंबी येथील आदिवासींच्‍या भूमींवर ३६ वर्षांपासून अवैध नियंत्रण मिळवले आहे, असा आरोप पीडित आदिवासींनी केला आहे.

राष्‍ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ आणि परिवाराचा घोटाळा ५०० कोटी रुपयांहून अधिक ! – किरीट सोमय्‍या

माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी केलेल्‍या घोटाळ्‍याची माहिती घेण्‍यासाठी किरीट सोमय्‍या हे कोल्‍हापूर येथे आले होते. तेव्‍हा त्‍यांनी प्रसिद्धी माध्‍यमांशी संवाद साधला.

‘एम्.आय.एम्.’ घेणार मुंबई आणि नवी मुंबई येथे राष्‍ट्रीय अधिवेशन !

‘एम्.आय.एम्.’ (मजलीस-ए-इत्तेहादुल-मुस्‍लमीन) या पक्षाकडून नवी मुंबईमध्‍ये २५ फेब्रुवारी, तर मुंबईमध्‍ये २६ फेब्रुवारी या दिवशी राष्‍ट्रीय अधिवेशन घेण्‍यात येणार आहे, अशी माहिती या खासदार इम्‍तियाज जलील यांनी दिली.

राज्‍यात वन औद्योगिक विकास महामंडळ चालू करणार ! – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री

वन औद्योगिक विकास महामंडळ चालू करण्‍यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्‍याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

संजय राऊत यांच्‍या विरोधात ठाणे येथे गुन्‍हा नोंद

ठाणे, नाशिक पाठोपाठ पुन्‍हा ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस ठाणे येथे संजय राऊत यांच्‍या विरोधात शिवसेना ठाणे शहर महिला संघटक आणि माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गुन्‍हा नोंद केला आहे.

महाशिवरात्रीनिमित्त सनातन संस्‍थेच्‍या वतीने देहली, फरिदाबाद, नोएडा आणि मथुरा (उत्तरप्रदेश) येथे पार पडले ग्रंथप्रदर्शन !

महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने सनातन संस्‍थेच्‍या वतीने देहली, फरिदाबाद (हरियाणा) आणि मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करण्‍यात आले.