धनबाद (झारखंड) – महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शिवाची कृपा संपादन करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे ३ दिवसांचा विशेष ‘ऑनलाईन’ कार्यक्रम आणि सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम प्रतिदिन दुपारी ४ ते ४.४५ या वेळेत घेण्यात आला. या वेळी समितीच्या कु. आद्या सिंह आणि कु. नंदिता अग्रवाल यांनी ‘भगवान शिवाचे आध्यात्मिक वैशिष्ट्ये, देवालयात शिवपिंडीचे दर्शन कसे करावे ? शिवाला बेलपत्र कसे वहावे ? शिवाला प्रदक्षिणा कशा घालाव्यात ?’, आदी विषयांवर शास्त्रोक्त माहिती दिली. सत्संगाच्या शेवटी सामूहिकपणे ‘ॐ नम: शिवाय’ हा नामजप करण्यात आला. या कार्यक्रमाला कतरास, धनबाद, रांची, जमशेदपूर, हजारीबाग, कोलकाता आणि पूर्वोत्तर भारत भागातील शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. समितीच्या युवा कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
विशेष
कार्यक्रमात काहींना शिवाचा सामूहिक नामजप करतांना विविध अनुभूती आल्या. एका महिला जिज्ञासूने ‘सामूहिक नामजप करतांना शिवाच्या चरणाशी बसले आहे’, असे तिला जाणवले.