राज्‍यातील सर्व शाळांमध्‍ये ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा होणार !

सध्‍या मातृदिन, पितृदिन, महिलादिन, कन्‍यादिन, योगदिन असे विविध दिवस साजरे केले जातात. आता राज्‍यातील सर्व शाळांमध्‍ये ‘आजी-आजोबा दिवस’ साजरा केला जाणार आहे. याविषयी शासन निर्णय झाला असून त्‍याचे परिपत्रकही लागू करण्‍यात आले आहे.

भारतीय वंशाच्‍या गायींचे ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ करण्‍यात भारतीय शास्‍त्रज्ञांना यश !

देशी वंशाच्‍या ४  गायींचे प्रथमच ‘जनुकीय क्रमनिर्धारण’ करण्‍यात भारतीय शास्‍त्रज्ञांना यश आले आहे. भोपाळच्‍या ‘भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्‍थे’तील (आयसर) संशोधकांनी कासरगोड ड्‌वार्फ, कासरगोड कपिला, वेचूर आणि ओंगोल या गायींची अनुवंशिक संरचना जगासमोर ठेवली आहे.

साहित्‍याचा संसार सरकारच्‍या कह्यात जाऊ नये, याचे भान राखा !

संमेलनाध्‍यक्ष निवृत्त न्‍या. नरेंद्र चपळगावकर यांनी साहित्‍य संस्‍था आणि साहित्‍यिक यांना सुनावले !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संमेलनाध्यक्ष नरेंद्र चपळगावकर यांच्या भाषणाच्या वेळी विदर्भवाद्यांकडून गोंधळ !

मराठी भाषेच्या संदर्भातील संमेलनात वेगळ्या विदर्भाची मागणी केली जाणे दुर्दैवी !

एन्.आय.ए. ला ई-मेलद्वारे मुंबई येथे आक्रमण करण्याची धमकी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) ई-मेल पत्त्यावर मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणार्‍याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे.

जळगाव येथे राज्यस्तरीय मंदिर परिषदेला आजपासून प्रारंभ !

मंदिरे आणि मंदिरांतील धर्मपरंपरा यांच्या रक्षणार्थ येथे आजपासून राज्यस्तरीय मंदिर परिषदेला प्रारंभ होत आहे. हिंदु जनजागृती समिती आणि श्री गणपति मंदिर देवस्थान विश्‍वस्त मंडळ (पद्मालय, जळगाव) यांच्या वतीने आयोजित ही परिषद ४ अन् ५ फेब्रुवारी या दिवशी शिरसोली रोड येथील ‘सुदर्शन पॅलेस’ सभागृहात होणार आहे.

कराची (पाकिस्तान) येथे जिहादी संघटनेने केली अहमदिया मुसलमानांच्या मशिदीची तोडफोड !

गेल्या काही दिवसांतील अशा प्रकारची ही ५ वी घटना असल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानमध्ये अहमदिया मुसलमानांना ‘मुसलमान’ समजले जात नाही.

केंद्रशासन प्रतिकिलो २९ रुपये ५० पैसे या दराने गव्हाच्या पिठाची विक्री करणार !

‘नाफेड’ आणि ‘एन्.एफ्.सी.सी.’ या संस्थांच्या माध्यमातून ६ फेब्रुवारीपासून  ही विक्री केली जाणार आहे.

उत्तरप्रदेशात मदरशातील मुलाने लैंगिक अत्याचार करून एका मुलाची केली हत्या !

मदरशांत जर वासनांध आणि खुनी मुले निपजत असतील, तर अशा मदरशांवर बंदी घालणे आवश्यक !

‘बीबीसी’च्या माहितीपटावर बंदी का घातली ?, याचे उत्तर द्या !  

सर्वोच्च न्यायालयाचा केंद्रशासनाला आदेश