सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय प्रादेशिक भाषांमध्ये २६ जानेवारीपासून झाले उपलब्ध !

सर्वोच्च न्यायालयाचे निर्णय विविध भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये देण्याच्या सेवेचा प्रारंभ करण्यात आला आहे. २६ जानेवारीच्या प्रजासत्ताकदिनापासून हे निकाल प्रादेशिक भाषांत मिळण्यास प्रारंभ झाला आहे.

(म्हणे) ‘लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी माध्यम स्वातंत्र्य आवश्यक !’ – नेड प्राईस, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाचे प्रवक्ते

बीबीसीने पंतप्रधान मोदी आणि गुजरात दंगलीवर बनवलेल्या माहितीपटावर केंद्राने बंदी घातली आहे. या माहितीपटाविषयी अमेरिकेने २ दिवसांत तिची भूमिका पालटली !

अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये लावण्यात आले आहेत मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मांमध्ये समानता असणारे फलक !

अमेरिकेमध्ये धर्मांध मुसलमानांच्या कारवाया वाढत असल्यामुळे तेथील मुसलमान समाजाविषयी तिरस्काराची भावना वाढत आहे. ती अल्प करण्यासाठीच इस्लामी संघटना ही खेळी खेळत आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?

वसंतपंचमीदिनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न !

वसंतपंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून आलेले भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते.

देशविरोधी शाहरूख खानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित करू नये !

देशविरोधी अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटासह त्याचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू नये, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच चित्रपट गृहाचे चालक आणि मालक यांना देण्यात आले.

सुरतमधील व्यापार्‍याला पुण्यात पिस्तुलासह अटक !

पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावर ही कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी विनापरवाना पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे यांच्यासह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

सातारा येथील हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘पठाण’ चित्रपटाला विरोध !

२४ जानेवारी या दिवशी सातारा शहरातील ‘राजलक्ष्मी’ आणि ‘सेव्हनस्टार’ चित्रपटगृह व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले. या वेळी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, तसेच भाजप आणि भाजपप्रणित व्यापारी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नव्या रथातून होणार करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीदेवीची नगर प्रदक्षिणा !

गेल्या दीड मासापासून हा रथ बनवण्याचे काम चालू असून या रथासाठी कर्नाटकातील भाविकाने १२ लाख रुपयांचे सागवानी लाकूड अर्पण केले आहे. यंदा चैत्र यात्रेनंतर ६ एप्रिलला होणारा देवीचा रथोत्सव हा नव्या रथातून साजरा केला जाणार आहे.

नांदेड येथे कार्यालय प्रमुख आणि तक्रारदार यांची समोरासमोर सुनावणी !

प्रत्यक्ष कार्यालय प्रमुख आणि अर्जदार यांची समोरासमोर सुनावणी घेत तक्रारींचा तात्काळ निपटारा केला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा होत असून त्यांचे कौतुकही होत आहे.

पोतले (तालुका कराड) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा पार पडली !

या सभेत लव्‍ह जिहाद, हलाल जिहाद या विषयांवर समितीच्‍या सौ. रूपा महाडिक यांनी उपस्‍थितांना विस्‍तृतपणे मार्गदर्शन केले.