‘उडाण’ अंतर्गत मिरज येथील कवलापूरमध्‍येच विमानतळ करा ! – सुधीर गाडगीळ, आमदार, भाजप

मिरज तालुक्‍यातील कवलापूर येथे विमानतळासाठी १६० एकर जागा आरक्षित आहे. या जागेवर पूर्वी धावपट्टी होती. कवलापूर येथे विमानतळाच्‍या जागेसाठी आरक्षण झाल्‍यास जिल्‍ह्याच्‍या कृषी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल.

‘महावितरण’च्‍या पुणे परिमंडळामध्‍ये वर्षभरात ५३ नागरिकांचा विजेच्‍या धक्‍क्‍याने मृत्‍यू

तुटलेल्‍या तारा, पडलेले खांब हटवण्‍याचा प्रयत्न करणे, ‘स्‍वीच बोर्ड’ आणि वायर स्‍वत:च दुरुस्‍त करणे, ओल्‍या लाकडी काठ्या किंवा लोखंडाने तारांना स्‍पर्श करणे आदी कारणांनी अपघात झाल्‍याचे समोर येत आहे.

नाशिक येथे भरदिवसा चोर्‍यांमुळे नागरिक भयभीत !

बंद दाराला कुलूप, मळ्‍याची वस्‍ती, शेतकरी कुटुंब आजूबाजूला कुणाची घरे नाहीत, हे पाहून भरदिवसा चोरी करण्‍याच्‍या घटनांमध्‍ये वाढ झाली आहे.  जिल्‍ह्यातील सिन्‍नर तालुक्‍यात अशा चोरीच्‍या घटना वारंवार समोर येत आहेत.

अध्यात्माचे महत्त्व न जाणणार्‍या शासनकर्त्यांमुळे देशाचे वाटोळे झाले आहे !

‘अध्यात्म सोडून एक तरी विषय ‘सात्त्विक, सज्जन, धर्मप्रेमी आणि राष्ट्रप्रेमी कसे व्हायचे’, हे शिकवतो का ? तसे नसतांना अध्यात्म सोडून अन्य सर्व विषय शिकवणार्‍या स्वातंत्र्यापासूनच्या ७५ वर्षांतील भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी देशाचे वाटोळे केले आहे.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

२६ जानेवारी : सनातनचे श्रद्धास्‍थान प.पू. भक्‍तराज महाराज (इंदूर, मध्‍यप्रदेश) यांचा प्रकटदिन

प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्‍कार !

राज्‍यभरात शाहरूख खानच्‍या ‘पठाण’ चित्रपटास ठिकठिकाणी विरोध

शाळा-महाविद्यालये येथे राष्‍ट्रप्रेमाचे धडे न दिल्‍याने आजचे तरुण देशासमोरील समस्‍यांना वेळ देण्‍याऐवजी भारतीय संस्‍कृतीचे हनन करणार्‍या चित्रपटांचे उदात्तीकरण करत आहेत, हे दुर्दैवी आहे !

विशाळगडावर उभारण्यात येत असलेल्या ‘अनधिकृत शेड’वर कारवाई करा !

विशाळगडावर होणारे अतिक्रमण सर्व यंत्रणा हाताशी असलेल्‍या पुरातत्‍व विभागास दिसत नाही का ? प्रत्‍येक वेळी हा विभाग कुणीतरी तक्रार केल्‍यावरच कारवाई करणार आहे का ?