अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये लावण्यात आले आहेत मुसलमान आणि ख्रिस्ती धर्मांमध्ये समानता असणारे फलक !

स्वयंसेवी इस्लामी संस्थेचा पुढाकार

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील काही शहरांमध्ये रस्त्यांच्या बाजूला असलेल्या खांबांवर ‘इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म यांच्यात समानता आहे’, या आशयाचे फलक लावण्यात आले आहेत. ह्यूस्टन शहरातील एका होर्डिंगवर लिहिले आहे, ‘मुस्लिम्स लव्ह जीसस.’ याचा अर्थ मुसलमान येशूवर प्रेम करतात. याच्या खाली लिहिले आहे, ‘एक ईश्‍वर आणि त्याचा संदेश.’ या फलकांवरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

१. इलिनोइस शहरातील इस्लामिक एजुकेशन सेंटर असणार्‍या ‘गेनपीस’ या स्वयंसेवी संस्थेने डलास, शिकागो आणि मिडिल न्यू जर्सी यांसारख्या अनेक शहरांत लावलेल्या फलकांवर सर्व धर्मांना समान दाखवण्यासह त्यांतील चुकीच्या गोष्ट संपवण्याविषयी संदेश लिहिले आहेत.

२. एका होर्डिंगमध्ये मदर मेरी यांना हिजाब घातलेले दाखवण्यात आले आहे. यावर लिहिण्यात आले आहे, ‘भाग्यशाली मेरी हिने हिजाब घातला होता. तुम्ही याचा सन्मान कराल ?’ अन्य एका होर्डिंगवर सौदी अरेबियातील मक्केतील काबा मशिदीचे छायाचित्र असून त्यावर ‘इब्राहिम द्वारे निर्मित, एका ईश्‍वराची पूजा करण्यासाठी समर्पित, लाखों मुसलमानांच्या वार्षिक तीर्थयात्रेचे स्थळ’, असे लिहिले आहे.

मुसलमान असण्यासाठी आपल्याला येशू आणि मेरी यांच्यावरही विश्‍वास ठेवायला हवा !

ह्यूस्टन येथे ‘गेनपीस’च्या एका सदस्याने सांगितले की, आम्हाला आता अनेक लोक दूरभाष करून विचारत आहेत की, इस्लाम आणि ख्रिस्ती धर्म यांच्यात काय समानता आहे ? आम्ही त्यांना सांगतो की, मुसलमान असण्यासाठी आपल्याला येशू आणि मेरी यांच्यावरही विश्‍वास ठेवायला हवा. त्यावर ते आश्‍चर्यचकित होतात. (मुसलमान होण्यासाठी भगवान श्रीराम, श्रीकृष्ण यांच्यावरही विश्‍वास ठेवायला हवा, अशा प्रकारचा संदेश भारतातील मुसलमान संघटना कधीतरी देतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • भारतात विशेषतः काश्मीर, केरळ आदी राज्यांत अन्य धर्मियांशी समानता असणारे फलक लावण्यास एखादी मुसलमान संघटना पुढाकार घेईल का ?, असा प्रश्‍न भारतियांच्या मनात उपस्थित झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • अमेरिकेमध्ये धर्मांध मुसलमानांच्या कारवाया वाढत असल्यामुळे तेथील मुसलमान समाजाविषयी तिरस्काराची भावना वाढत आहे. ती अल्प करण्यासाठीच इस्लामी संघटना ही खेळी खेळत आहेत, असे कुणाला वाटल्यास त्यात चूक ते काय ?