पोतले (तालुका कराड) येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा पार पडली !

हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेत मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीच्‍या सौ. रूपा महाडिक

कराड, २५ जानेवारी (वार्ता.) – येथील पोतले गावामध्‍ये हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने नुकतीच हिंदु राष्‍ट्र-जागृती सभा घेण्‍यात आली. या सभेत लव्‍ह जिहाद, हलाल जिहाद या विषयांवर समितीच्‍या सौ. रूपा महाडिक यांनी उपस्‍थितांना विस्‍तृतपणे मार्गदर्शन केले. पोतले गावातील श्री विठ्ठल मंदिरात २२ जानेवारी या दिवशी सायंकाळी ७ वाजता ही सभा घेण्‍यात आली.

सभेस उपस्‍थित धर्माभिमानी

सभेस ११५ धर्माभिमानी हिंदु युवक आणि महिला उपस्‍थित होते. प्रारंभी श्री. अनिकेत कदम यांनी हिंदु जनजागृती समितीच्‍या कार्याचा परिचय थोडक्‍यात विशद केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री. चेतन देसाई यांनी केले.