वसंतपंचमीदिनी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न !

श्री विठ्ठलाच्या चरणी पावणेदोन कोटी रुपयांचे दागिने अर्पण

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – वसंतपंचमीच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचा विवाह सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडला. राज्याच्या विविध भागांतून आलेले भाविक या सोहळ्यासाठी उपस्थित होते. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते.

सौजन्य झी 24 तास

या विवाह सोहळ्यासाठी जालना येथील एका भाविकाने पावणेदोन कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी यांना सोन्याचे मुकूट, सोन्याच्या बांगड्या, मोहनमाळ, कोल्हापूरी साज, मंगळसूत्र असे दागिने, तसेच चांदीची भांडीही अर्पण केली आहेत. मागील ५० वर्षांच्या कालावधीत श्री विठ्ठलाच्या चरणी अर्पण झालेले सर्वांत मोठे अर्पण आहे.