पुणे – सुरत येथील अनिल कुमार उपाध्याय या कापड व्यापार्याला पुणे लोहमार्ग पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पिस्तुलासह अटक केली आहे. पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकावर ही कारवाई केली असून या कारवाईत पोलिसांनी विनापरवाना पिस्तूल आणि ६ जिवंत काडतुसे यांच्यासह साडेतीन लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्याने आपल्याजवळ पिस्तूल कोणत्या कारणासाठी बाळगले होते, याचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार निशीकांत राऊत यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सुरतमधील व्यापार्याला पिस्तुलासह पुण्यात अटक, तपासाबाबत पोलिसांची गुप्तता https://t.co/zFx7xBYId5
— Lokmat (@lokmat) January 25, 2023
पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हे पिस्तूल मध्यप्रदेशातील भोपाळ येथे शर्मा नावाच्या व्यक्तीने दिल्याचे सांगितले आहे. तो नागपूरला जात होता. आरोपीकडे केलेल्या अन्वेषणात महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे समजते; मात्र पोलिसांकडून यासंदर्भात कमालीची गुप्तता पाळली जात आहे.