देशविरोधी शाहरूख खानचा कोणताही चित्रपट प्रदर्शित करू नये !

विश्व हिंदु परिषदेचे पोलीस, प्रशासन, चित्रपटगृह चालक आणि मालक यांना निवेदन

सोलापूर, २६ जानेवारी (वार्ता.) – देशविरोधी अभिनेता शाहरूख खानच्या ‘पठाण’ चित्रपटासह त्याचा कोणताही चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करू नये, अशी मागणी विश्व हिंदु परिषदेने केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, तसेच चित्रपट गृहाचे चालक आणि मालक यांना देण्यात आले. या वेळी विश्व हिंदु परिषदेचे जिल्हा मंत्री संजयकुमार जमादार, तसेच सर्वश्री प्रमोद येलगेटी, नागेश बंडी, शीतल परदेशी, राजू मनसावले, प्रशांत परदेशी, दीपक मुखता यांसह बजरंग दलाचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देतांना कार्यकर्ते

निवेदनात म्हटले आहे की,

१. शाहरूख खानचे वागणे देशविरोधी असल्याचे त्याच्या अनेक कृतींतून लक्षात येते. भारत देशाने ‘वर्ल्डकप’ जिंकल्यानंतर शाहरूख खानने भारताचा राष्ट्रध्वज उलटा फडकवला, तसेच ‘भारतात असहिष्णुता वाढीस लागली आहे’, असे वक्तव्य केले. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची प्रतिमा मलीन केली आहे. आतंकवादी हाफीज सईदने पाकिस्तानात येऊन रहाण्याचे सुचवल्यावर त्याला एका शब्दानेही विरोध केला नाही.

२. अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सीएए कायद्याच्या विरोधातील आंदोलनात जे.एन्.यू.मध्ये पाठिंबा देण्यासाठी गेली होती. या आंदोलनात देशविरोधी घोषणा दिल्या गेल्या होत्या. याचाच अर्थ हे कलाकार पडद्यावर देशप्रेमाची भूमिका बजावतात; मात्र त्यांची प्रत्यक्ष भूमिका देशविरोधी असते.

३. ‘पठाण’ चित्रपटातील काही दृश्ये हिंदु धर्मियांच्या भावना दुखावणारी आहेत. हिंदूंच्या भावना दुखावल्याने त्यांच्या भावनांचा उद्रेक होऊन चित्रपटगृहाच्या खासगी मालमत्तेची हानी झाल्यास या घटनेला चित्रपटगृह चालक आणि मालक उत्तरदायी रहातील. यापुढे देशविरोधी अभिनेत्यांचे चित्रपट प्रदर्शित न करता जाज्वल्य देशाभिमान जागृत करणारे चित्रपट प्रदर्शित करावेत.