‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पहाता येण्यासाठी मध्यप्रदेशातील पोलीस कर्मचार्‍यांना रजा संमत करण्याचा आदेश !

राज्यातील पोलीस कर्मचार्‍यांना कुटुंबासह ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट बघता यावा, यासाठी त्यांना रजा संमत करण्यात यावी, असा आदेश राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिला.

बिटकॉईन फसवणूकप्रकरणी अटक केलेल्या सायबर तज्ञांचे घर आणि कार्यालय यांची झडती !

आरोपीच्या बिटकॉईन वॉलेटवरील बिटकॉईन आणि विविध प्रकारची क्रिप्टोकरन्सी ही विविध वॉलेटवर वर्ग केल्याचे उघड झाले असून त्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाला आहे.

विकासकामांसाठी निधी अल्प पडू दिला जाणार नाही ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कृषी, सार्वजनिक आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या पंचसूत्री कार्यक्रमाची कार्यवाही करून मानवी जीवनमान उंचविण्याकरता प्रयत्न केले जातील.

हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात ईश्वराची कृपा संपादन करून सहभागी होऊया ! – सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था

ईश्वराची कृपा संपादन करण्यासाठी साधना करायला हवी आणि समवेत हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यातही ईश्वराचे आशीर्वाद मिळवण्यासाठी साधना करायला हवी.

आता कर्नाटकातही ‘द कश्मीर फाइल्स’ करमुक्त !

कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी १३ मार्चच्या रात्री ट्वीट करून ʻद कश्मीर फाइल्सʼ हा चित्रपट कर्नाटक राज्यात करमुक्त करण्याची घोषणा केली.

राज्यातील सेवानिवृत्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगातील फरकापोटी ९११ कोटी रुपये वितरित !

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत ही माहिती प्रश्‍नोत्तराच्या वेळी दिली. आमदार सुनील राणे आणि विजयकुमार देशमुख यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला होता.

भारताचे अद्वितीयत्व !

‘पाश्चात्त्य देश मायेत पुढे जायला शिकवतात, तर भारत ईश्वरप्राप्तीच्या मार्गाने कसे जायचे ते शिकवतो !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

श्री महालक्ष्मी मंदिर आणि श्री जोतिबा देवस्थान येथील ‘ई-पास’ची सक्ती रहित !

जोतिबा देवस्थान येथील हक्कदार पुजारी, गुरव समाज, ग्रामस्थ, भाविक यांसह हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आंदोलनाचे संघटित यश !

लेखकांनी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची अपकीर्ती करणारे पुस्तक मागे घेतले !

विश्व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्याने दिलेल्या नोटिसीचा आणि प्रविष्ट केलेल्या तक्रारीचा परिणाम ! या लेखकांचे अन्य धर्मियांच्या संघटनांविषयी अशा प्रकारे लिहिण्याचे धाडस झाले असते का ?

काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारांचे सत्य सर्वांपर्यंत पोचायला हवे ! – दर्शन कुमार, अभिनेता

काश्मिरी पंडितांवर (हिंदूंवर) झालेल्या अत्याचारांचे सत्य सर्वांपर्यंत पोचायला हवे. काश्मिरी हिंदूंची हत्या करणारा एक दहशतवादी मुलाखतीत सहजतेने म्हणतो की, ‘मी २५ माणसांना मारले.’ ही सत्यता ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये दाखवण्यात आली आहे.