रशिया-युक्रेनच्या युद्धावर बोलणारे काश्मीरमधील हिंदूंवर झालेल्या अत्याचारांविषयी का बोलत नाहीत ? – प्रा. रेणुका धर बजाज, देहली विद्यापीठ

‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट ७०० काश्मिरी कुटुंबांशी चर्चा करून आणि ३ वर्षे अभ्यास केल्यानंतर हिंदूंची वस्तूस्थिती मांडणारा बनवण्यात आला आहे. या चित्रपटातून काश्मिरी हिंदूंवर झालेल्या अत्याचाराचे भीषण सत्य भारतियांपर्यंत पोचवण्याचे काम केले आहे.

इंदूर येथे प.पू. रामानंद महाराज यांची पुण्यतिथी भावपूर्ण वातावरणात साजरी !

कार्यक्रमात सनातनच्या ‘श्री अनंतानंद साईश यांचे शिष्योत्तम प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

‘महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम’ संपूर्ण राज्यात राबवला जाणार !

सातारा येथे या उपक्रमास मिळालेल्या यशामुळे आता हा उपक्रम राज्यभर राबवण्यात येणार आहे. ११ मार्च या दिवशी विधानसभेत सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.

नितेश राणे आणि नीलेश राणे यांच्या विरोधात मुंबईत गुन्हा नोंद !

खासदार शरद पवार यांचे नाव आतंकवादी दाऊद इब्राहिमशी जोडल्याचे प्रकरण

मुंबई येथील प्रांतीय हिंदु अधिवेशनात सद्गुरु आणि मान्यवर यांच्या हस्ते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गाच्या हिंदी भाषेतील ग्रंथाचे प्रकाशन !

मुलुंड येथे १२ आणि १३ मार्च या दिवशी हे अधिवेशन झाले. डॉक्टर, अधिवक्ता, उद्योजक, पत्रकार, लोकप्रतिनिधी आदी विविध क्षेत्रांतील आणि विविध संघटनांचे हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आदर्श ठेवून शौर्य जागृत करण्याची आवश्यकता ! – कु. नारायणी शहाणे, हिंदु जनजागृती समिती

आपल्यामध्ये शौर्य आधीपासूनच आहे; पण ते सुप्तावस्थेत आहे. आता त्याला जागृत करूया. आता क्रांतिकारकांचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्म यांसाठी वेळ देऊया.

आरोपीप्रमाणे मला प्रश्न विचारले, सरकारच्या हाती काहीही लागणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

मुंबई सायबर पोलिसांकडून देवेंद्र फडणवीस यांची २ घंटे चौकशी !

जिल्हा हिवताप अधिकारी शासकीय वाहन घरगुती कामांसाठी उपयोगात आणत असल्याची तक्रार !

जिल्हा हिवताप अधिकारी घरातून कामकाज पहात आहेत. त्यांना कामकाजासाठी दिलेले शासकीय वाहन ते घरगुती कामांसाठी उपयोगात आणत आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र वाडेकर यांनी केला आहे.