गंगानदीच्या घाटावर अहिंदूंना प्रवेश नसल्याची सूचना देणारे फलक तक्रार नसतांनाही पोलिसांनी काढले !

तक्रार नसतांनाही फलक काढण्याची ‘तत्परता’ दाखवणारे पोलीस हिंदूंनी तक्रार केल्यावर मात्र कारवाई करण्यास टाळाटाळ करतात, हे लक्षात घ्या ! उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना असे होणे हिंदूंना अपेक्षित नाही !

वर्धक मात्रेसाठी (बूस्टर डोससाठी) नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही ! – केंद्र सरकार

केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार देशभरात ८ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीची वर्धक मात्र (बूस्टर डोस) देण्यात येणार आहे. या मात्रेसाठी ‘कोविन’ या अ‍ॅपवर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही.

(म्हणे) ‘मुसलमानांनी कायदा हातात घेतला, तर हिंदूंना पळण्यासाठीही जागा मिळणार नही !’ – मौलाना तौकीर रझा यांची गरळओक

उत्तरप्रदेशमध्ये अशा प्रकारचे विधान मौलानाकडून होत आहे, हे पहाता ‘त्यांना कायद्याचा धाक नाही’, हेच लक्षात येते. अशांवर भाजप सरकारने तातडीने कारवाई करून कारागृहात डांबले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील २ धर्मांधांना ८ वर्षांचा कारावास !

असे किती धर्मांध अशा आतंकवादी संघटनांत सहभागी होण्यासाठी गेले होते आणि किती जणांना सरकारने अटक करून कारागृहात टाकले, याचीही माहिती जनतेला कळली पाहिजे !

भारतमाता आणि भूमाता यांच्या विरोधात अवमानकारक विधाने करणार्‍या पाद्य्रावरील गुन्हा रहित करण्यास मद्रास उच्च न्यायालयाचा नकार

अशा प्रकारचा निर्णय देणर्‍या मद्रास उच्च न्यायालयाचे अभिनंदन ! ‘न्यायालयाने पुढे अशा आरोपींना दोषी ठरवून कठोरातील कठोर शिक्षा दिल्यास अन्य लोकांवर याचा वचक बसेल’, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !

गोव्यात निवडणूक प्रचाराच्या वेळी पैशांचे वाटप रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत ! – मुख्य निवडणूक अधिकारी

असे मुख्य निवडणूक अधिकार्‍यांना म्हणावे लागणे आणि निवडणुकांत पैशांचे वाटप होणे आतापर्यंतच्या सर्व राजकीय पक्षांना लज्जास्पद !

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन पुरातत्व विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या माध्यमातून केले जाईल ! – के.मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग

विजयदुर्ग किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व आणि परंपरा येथे येणार्‍या प्रत्येक पर्यटकाला कळण्यासाठी निश्‍चितपणे या किल्ल्याचे संवर्धन केले जाईल.

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी हिंदु जनजागृती समिती, विजयदुर्ग ग्रामविकास समिती आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पहाणी केली त्यावेळी झालेल्या चर्चेचा वृत्तांत ….

शंखवाळ-(सांकवाळ) गोवा, येथील पुरातन श्री विजयदुर्गा मंदिराच्या स्थानाचे रक्षण व्हावे !

हा लढा आम्ही चालू ठेवणार आहोत आणि याविषयी न्याय मागणार आहोत. हिंदूंच्या भावनांचा कुणीही अंत पाहू नये. आम्ही ख्रिस्ती संत वगैरे यांनाही मानतो; परंतु विजयादुर्गा मातेच्या जागेवर होणारे अतिक्रमण सहन करणार नाही – शंखावली तीर्थक्षेत्र रक्षा समिती

ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलीस आणि प्रशासन यांना निवेदने

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी व्याख्याने घेऊन आणि साप्ताहिक धर्मशिक्षणवर्गांतूनही याविषयी प्रबोधन करण्यात आले, तसेच फलक प्रसिद्धी, सामाजिक माध्यमांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले.