वर्धक मात्रेसाठी (बूस्टर डोससाठी) नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही ! – केंद्र सरकार

नवी देहली – केंद्र सरकारने केलेल्या घोषणेनुसार देशभरात ८ जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीची वर्धक मात्र (बूस्टर डोस) देण्यात येणार आहे. या मात्रेसाठी ‘कोविन’ या अ‍ॅपवर नव्याने नोंदणी करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात.