‘इस्लामिक स्टेट’मध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील २ धर्मांधांना ८ वर्षांचा कारावास !

  • ८ वर्षांनी आरोपींची जिहादी मानसिकता पालटेल, याची निश्‍चिती कोण देणार ? – संपादक
  • असे किती धर्मांध अशा आतंकवादी संघटनांत सहभागी होण्यासाठी गेले होते आणि किती जणांना सरकारने अटक करून कारागृहात टाकले, याचीही माहिती जनतेला कळली पाहिजे ! – संपादक
  • यापूर्वी या आतंकवादी संघटनेत सहभागी होण्याचा प्रयत्न करणार्‍या अनेक धर्मांधांचे पोलिसांनी समुपदेशन केले होते ! आता या आरोपींना झालेली शिक्षा पहाता अशा प्रवृत्तींना समुपदेशानाची नव्हे, तर कारागृहाचीच आवश्यकता आहे, हे पोलीस आता तरी लक्षात घेतील का ? – संपादक
रिझवान अहमद आणि मोहसीन सय्यद

मुंबई – ‘आय्.एस्.आय्.एस्.’ (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया) या जिहादी आंतकवादी संघटनेत सहभागी होण्यासाठी गेलेल्या मुंबईतील मोहसीन सय्यद आणि रिझवान अहमद या दोघांना राष्ट्रीय अन्वेषण संस्थेच्या विशेष न्यायालयाने ७ जानेवारी या दिवशी ८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. दोघांना प्रत्येकी १० सहस्र रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. पैसे न भरल्यास शिक्षेचा कालावधी आणखी ३ मास वाढवण्यात येणार आहे.

मोहसीन आणि रिझवान हे मालवणी येथे रहाणारे आहेत. वर्ष २०१५ मध्ये ‘आय्.एस्.आय्.एस्.’मध्ये सहभागी होण्यासाठी हे दोघेही घर सोडून गेले होते. या प्रकरणी दोघांच्या विरोधात काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पुढे हे प्रकरण राष्ट्रीय अन्वेषण संस्थेकडे सोपवण्यात आल्यावर जुलै २०१६ मध्ये दोघांच्या विरोधात आरोपपत्र प्रविष्ट करण्यात आले होते. दोघांनीही डिसेंबर २०२१ मध्ये स्वत:चा गुन्हा मान्य करून शिक्षा रहित करण्यासाठी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. स्वत:हून गुन्हा मान्य केल्यामुळे त्यांची जन्मठेपेची शिक्षा टळली.