हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न करणे आणि साधनेचे प्रयत्न वाढवणे, हीच खरी दिवाळी ! – पू. रमानंद गौडा, धर्मप्रचारक, सनातन संस्था

दिवाळीनिमित्त सनातन संस्थेच्या वतीने समस्त हिंदू बांधवांसाठी आयोजिलेल्या एका विशेष ऑनलाईन सत्संगात जिज्ञासूंना सनातनचे पू. रमानंद गौडा यांनी संबोधित केले.

त्रिपुरामध्ये बांगलादेशी पशूतस्कराचा जमावाच्या मारहाणीत मृत्यू

तिघे जण येथील लिटन पॉलच्या घराबाहेरील गाय चोरी करत होते. या वेळी लोकांना जाग आल्यावर त्यांनी या तस्करांना पकडण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी दोघे पळून गेले, तर एकाला लोकांनी पकडून मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या दैनंदिन चाचण्या आता निम्म्यावर !

एप्रिल ते जून या कालावधीत ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ ७० टक्के; परंतु २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत सरकारी आकडेवारीनुसार एकूण चाचण्यांमधील ‘आर्.टी.पी.सी.आर्.’चा वाटा ६२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

अनिल देशमुख यांची रवानगी पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत

सत्र न्यायालयाचा निर्णय रहित करत मुंबई उच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रवानगी पुन्हा अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत केली आहे. त्यांना १२ नोव्हेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अभिनेते शाहरुख खान यांच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी आर्यन याचे अपहरण ! – नवाब मलिक, अल्पसंख्यांकमंत्री

अभिनेते शाहरुख खान याच्याकडून खंडणी वसूल करण्यासाठी आर्यन याच्या अपहरणाचा डाव आखण्यात आला होता, असा आरोप अल्पसंख्यांकमंत्री नवाब मलिक यांनी ७ नोव्हेंबर या दिवशी पत्रकार परिषदेत केला.

कार्तिकी वारीसाठी आरोग्य विभागाच्या अनुमतीची आवश्यकता नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाच्या संसर्गाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या कार्तिकी वारीसाठी आता स्वतंत्र अनुमतीची आवश्यकता भासणार नाही, असे आरोग्यमंत्री यांनी स्पष्ट केले.

पू. सिद्धेश्वर स्वामीजींच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बोलवाड-टाकळी (जिल्हा सांगली) येथील ‘श्री गुरुदेव तपोवनात’ विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार !

बोलवाड-टाकळी येथील ‘श्री गुरुदेव तपोवनात’ विश्वसंत ज्ञानयोगी पू. सिद्धेश्वर स्वामीजी यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

२० मासांनंतर कार्तिकी यात्रा भरणार !

कोरोनाच्या संसर्गाच्या सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे साधारण २० मासांनंतर पंढरपूर येथे कार्तिकी यात्रा भरणार आहे. 

नवाब मलिकांविरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट !

अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात १ कोटी २५ लाख रुपयांचा मानहानीचा दावा प्रविष्ट केला आहे.

शिक्षणसंस्थांचा दर्जा सुधारणार केव्हा ?

अनेक कला आणि विद्या यांचे माहेरघर खरे तर भारत आहे. मुख्य म्हणजे आता सध्या जग हे ज्या हिंदु धर्माच्या प्रेमात पडत आहे, त्याच्या धर्मग्रंथांचे शास्त्रशुद्ध शिक्षण भारतीय विद्यापिठांमध्ये देण्यास प्रारंभ करणे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआपच परदेशींचा भारताकडे ओढा वाढेलच आणि भारतालाच ते अधिक लाभदायक होईल !