सीमाभागातील मराठी जनांना न्याय कधी ?

तत्कालीन केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधात मराठी भाषिक ६५ वर्षांपासून त्यांच्या या अधिकारासाठी लढत असून अजूनही ते न्यायाच्याच प्रतीक्षेत आहेत. केंद्रशासनानेच पुढाकार घेऊन या प्रश्नावर मार्ग काढणे अत्यावश्यक आहे.

नेरूळ येथे गावदेवी मंदिर परिसरातील मद्यपींना हटकणार्‍या मंदिर विश्वस्तांवर प्राणघातक आक्रमण; आरोपी अटकेत

नेरूळ येथील गावदेवी मंदिराच्या परिसरातील मद्यपींना हटकणार्‍या मंदिर विश्वस्तांवर मद्यपींकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले. ही घटना ४ नोव्हेंबरच्या रात्री घडली असून यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

नारायणगाव (जिल्हा पुणे) येथे प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक !

प.पू. काणे महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त नारायणगाव-पुणे येथे रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक यांचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी श्री. श्रीपाद ठुसे आणि सौ. शीतल ठुसे यांनी पादुकांवर रुद्राभिषेक आणि पवमान अभिषेक केला.

नागपूर येथे ‘यु.सी.एन्. केबल नेटवर्क’वरील चर्चासत्रात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने दीपावलीच्या धर्मशास्त्राविषयी प्रबोधन

‘यु.सी.एन्. केबल नेटवर्क’द्वारे दिवाळीनिमित्त विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीचा सहगभाग होता.

मुंबईत फटाक्यांमुळे ५८ ठिकाणी आग लागल्याच्या घटना !

फटाक्यांच्या दुकानांत अग्नीप्रतिबंधक उपाययोजना केल्या नसल्याचे उघड

दादर (मुंबई) येथे मराठी फेरीवाल्यांची संख्या घटली !

दादर येथे मराठी फेरीवाल्यांची आकडेवारी २०-२५ टक्के इतकीच राहिली आहे. काही काळापूर्वी दादर परिसरात मराठी फेरीवालेच दिसायचे; पण आता सर्व व्यवसाय परप्रांतियांच्या हातात गेले आहेत. भाडेकरू फेरीवाल्यांमुळे परप्रांतियांची संख्या अधिक वाढलेली आहे.

पुणे येथे मौजमजेसाठी दुचाकी गाड्या चोरणार्‍या टोळीला अटक !

मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍यांवर संस्कारही नाहीत आणि कायद्याचा धाकही नाही, हे गंभीर आहे.

हिंदूंनी निर्भिडपणे नित्य धर्माचरण केल्यास त्यांना ईश्वराचा आशीर्वाद लाभेल ! – वैद्य संजय गांधी, सनातन संस्था

‘मलकापूर शाहुवाडी तालुका वैद्यकीय संघटने’च्या वतीने श्री धन्वंतरी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी २४ जणांची उपस्थिती होती.

फटाक्यांची अवैध विक्री रोखण्यासाठी विविध ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदने

फटाक्यांची अवैध विक्री रोखण्यासाठी भिवंडी, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणी हिंदुत्वनिष्ठांकडून निवेदने दिली.

आध्यात्मिक उन्नतीसाठी साधनेचे प्रयत्न तळमळीने करा ! – सौ. लक्ष्मी पै

युवा शिबिरार्थींना हिंदु जनजागृती समितीचा उद्देश आणि हिंदु राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने समिती करत असलेले विविध उपक्रम, सामाजिक माध्यमांद्वारे होणारा प्रसार इत्यादींविषयी माहिती दिली.