नवी देहली – कोरोनाच्या दुसर्या लाटेच्या कालावधीत, म्हणजेच एप्रिल आणि मे मासांमध्ये प्रतिदिन होत असलेल्या चाचण्यांमध्ये घट होऊन आता निम्म्याच चाचण्या होत आहेत. एप्रिलमध्ये प्रतिदिन सरासरी १८ लाख, तर मे मासामध्ये प्रतिदिन १९ लाख ५० सहस्र चाचण्या केल्या गेल्या; मात्र ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत एकाही दिवशी चाचण्यांची संख्या ११ लाखांपर्यंत पोचली नाही. ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ (कोरोनाच्या चाचणीचा प्रकार) चाचण्यांची टक्केवारी देशात अल्प होत आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ ७० टक्के, तर जलद चाचण्या ३० टक्के होत होत्या; परंतु २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंतच्या कालावधीत सरकारी आकडेवारीनुसार एकूण चाचण्यांमधील ‘आर्.टी.पी.सी.आर्.’चा वाटा ६२ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.