मुंबई – अमली पदार्थविरोधी पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात १ कोटी २५ लाख रुपयांचा मानहानीचा दावा प्रविष्ट केला आहे.
मलिक यांनी समीर वानखेडे आणि त्यांचे वडील यांच्या जात प्रमाणपत्रावर संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात मानहानीचा दावा प्रविष्ट केला आहे. यामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे यांतून आपल्या कुटुंबियांविषयी प्रसारित होणार्या वृत्तांवर बंदी घातली जावी, अशी मागणी केली आहे.