भारत शस्त्रसंधीचे पालन करील, पाकनेही तिचे पालन करावे ! – भारतीय सैन्य

गेल्या १८ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार आहे; मात्र पाकने एकदाही त्याचे पालन केलेले नाही. अशा पाकवर विश्‍वास कोण ठेवणार ? त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहून पाकच्या कुरापतींना जशासतसे उत्तर दिले पाहिजे !

इस्रोकडून १९ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण !

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘पी.एस्.एल्.व्ही.’ रॉकेटच्या माध्यमातून सकाळी १० वाजून २४ मिनिटांनी इस्रोने यशस्वीरित्या १९ उपग्रह अंतराळात पाठवले.

जैश-उल-हिंद संघटनेने दायित्व स्वीकारले !

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटेलिया इमारतीबाहेर जिलेटिनच्या कांड्या ठेवलेली जीप जैश-उल-हिंद या आतंकवादी संघटनेने ठेवली असल्याचे पत्रक त्यांनी काढले आहे.

हिंदू असल्याचे सांगून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे लैंगिक शोषण करणार्‍या धर्मांधाला अटक

झारखंड राज्यांत लव्ह जिहादविरोधी कायदा नसल्याने या धर्मांधावर कठोर कारवाई होण्याची शक्यता अल्प आहे. यामुळेच केंद्र सरकारने देशभरासाठी लव्ह जिहादविरोधी कायदा करणे आवश्यक आहे !

यावल येथे गोवंशियांची कातडी असलेल्या दोन ट्रकसह ४ संशयित पोलिसांच्या कह्यात !

महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतांनाही गोवंशियांची सर्रास हत्या घडणे, हे सरकारला लज्जास्पद ! कायद्याची प्रभावी कार्यवाही करण्याची हिंदूंची मागणी !

नागरिकांना लुटणार्‍या उत्तरप्रदेश येथील पसार धर्मांधास ठाणे येथे अटक

लोकसंख्येत अल्पसंख्यांक असणारे धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !

वाशी येथे मनसेच्या वतीने ‘मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी’ अभियान

मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करून कार्यक्रमास प्रारंभ केला. या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई शहर सहसचिव अमोल इंगोले-देशमुख आणि वाशी विभागाचे अध्यक्ष अशोक भोसले यांनी केले होते. या प्रसंगी महाराष्ट्र सैनिक आणि मराठी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी शाळेत शिक्षण घेतल्याने मुंबई महापालिकेने नोकरी नाकारलेल्या १५९ तरुण-तरुणींचे आंदोलन

राज्यभर ‘मराठी भाषा दिन’ साजरा झाला; पण मराठीबहुल महाराष्ट्रात अशी घटना घडणे लज्जास्पद !

प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव हवे !

मराठी भाषा ही छत्रपती शिवरायांची भाषा आहे. छत्रपती शिवरायांनी फारसी भाषेतील शब्दांना मराठी प्रतिशब्द असणारा शब्दकोश सिद्ध केला. त्यांच्यामुळेच आपण हा दिवस पाहू शकत आहोत. आपणही शासकीय अवघड शब्द पालटून तेथे सोपे शब्द आणण्याचा प्रयत्न करत आहोत.

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय १ मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित ! – अधिष्ठाता डॉ. दीक्षित

सध्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे १ मार्चपासून पुन्हा कोरोना रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.