नवी मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाशी विभागाच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. सेक्टर ९, वाशी बस स्थानक येथे मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी मराठीमध्ये स्वाक्षरी करून कार्यक्रमास प्रारंभ केला. या कार्यक्रमाचे आयोजन नवी मुंबई शहर सहसचिव अमोल इंगोले-देशमुख आणि वाशी विभागाचे अध्यक्ष अशोक भोसले यांनी केले होते. या प्रसंगी महाराष्ट्र सैनिक आणि मराठी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
मराठी नामफलक न लावणार्या मुंबईतील ६ सहस्रांहून अधिक आस्थापनांवर कारवाई !
मराठी प्रवाशाला बळजोरीने अंधेरी येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात २ घंटे डांबले !
रेल्वेस्थानक छताचा भाग कोसळला : उत्तरदायी ठेकेदाराला काळ्या सूचीत टाका !
मराठी आणि कोकणी या भाषांचे सहअस्तित्व महत्त्वाचे !
आदिवासी विद्यार्थ्यांना ‘अरीटे इठूबा’ केंद्राद्वारे मातृभाषेतून मराठी भाषेचे संस्कार !