|
जळगाव – जिल्ह्यातील यावल येथील हडकाई नदीपात्रात गोवंशियाची कातडी असलेले दोन ट्रक पोलिसांनी कह्यात घेतले असून चार संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलीस शिपाई राहुल रतन चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सय्यद सुभान सय्यद बिलाल (यावल), मोहम्मद इमरान मोहम्मद इकबाल (जळगाव), शेख चाँद शेख इजाजुल (हावडा, कोलकाता), नवाब आलम मेहबूब आलम (हावडा, कोलकाता) यांना २७ फेब्रुवारी या दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास गोवंशियांच्या कातडीसह कह्यात घेण्यात आले. दोन्ही ट्रक मिळून ४६५ कातडी मिळाली आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ५ (ब) ९ आणि ११ प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास चालू आहे.