भारत शस्त्रसंधीचे पालन करील, पाकनेही तिचे पालन करावे ! – भारतीय सैन्य

गेल्या १८ वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी करार आहे; मात्र पाकने एकदाही त्याचे पालन केलेले नाही. आता पाकने ‘आम्ही त्याचे पालन करू’, असे स्वतःहून भारताला सांगितले आहे; मात्र पाकवर विश्‍वास कोण ठेवणार ? त्यामुळे भारताने नेहमीच सतर्क राहून पाकच्या कुरापतींना जशासतसे उत्तर दिले पाहिजे !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जर पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार नसेल, तर दोन्ही देशांमध्ये शांतता नांदू शकते. भारत शस्त्रसंधीचे पालन करणार आहे; मात्र पाकनेही त्याचे पालन केले पाहिजे, असे भारतीय सैन्याच्या २८ इंन्फंट्री डिविजनचे जनरल ऑफिसर कमांडिंग मेजर जनरल  वी.एम्.बी. कृष्णन् यांनी म्हटले आहे.

दोन्ही देशांतील सैन्यांत झालेल्या या शस्त्रसंधी कराराविषयी पाकचे पंतप्रधान  इम्रान खान यांनी,

‘या करारामुळे दोन्ही देशांतील संबंधांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण बनवण्याचे दायित्व भारताचे आहे. आम्ही नेहमीच शांततेची अपेक्षा करत आहोत. तसेच सर्व प्रलंबित सूत्रांवर तोडगा काढण्यासाठी चर्चेला सिद्ध आहोत’, असे म्हटले आहे. (यावरून ‘जी अशांती उद्भवलेली आहे, त्याला पाक नाही, तर भारत उत्तरदायी आहे’, असेच इम्रान खान कांगावा करत असल्याचे यातून दिसून येते. अशांशी शस्त्रसंधी करणे, हा आत्मघात होय ! – संपादक)