माता-पित्यांना न सांभाळणार्‍या वाशिम जिल्हापरिषदेतील कर्मचार्‍यांना ३० टक्के रक्कम माता-पित्यांच्या खात्यांत जमा करावी लागणार !

वाशिम जिल्हा परिषदेने घेतलेला स्तुत्य निर्णय !

मथुरेतील गोवर्धन पर्वतावरचे दगड ऑनलाईन विकणार्‍या तिघांना अटक

मथुरा येथील संत सिया राम बाबा यांनी म्हटले की, गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्ण आहेत. गोवर्धनशी संबंधित कोणताही व्यवसाय करणार्‍या व्यक्तीला तो देवतांचा अपमान करत असल्याचे समजले जाईल.

जामखेड (जिल्हा नगर) येथील पोलीस ठाण्यात भास्कर पेरे यांच्यावर गुन्हा नोंद

ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीचा पराभव झाल्यामुळे आलेल्या नैराश्यातून आदर्श गाव पाटोद्याचे (जिल्हा संभाजीनगर) माजी सरपंच भास्करराव पेरे यांनी अर्वाच्च भाषा वापरून पत्रकारांना अवमानित केले. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात पेरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला.

सोनिया गांधी निवडून गेल्यावर जनतेला भेटत नाहीत ! – काँग्रेसच्याच आमदार अदिती सिंह यांची टीका

काँग्रेसच्या गांधी घराण्याने जितकी वर्षे देशावर राज्य केले तितकी वर्षे जनतेसाठी आणि देशासाठी काहीही केले नाही

नागपूर येथे दादागिरी करणार्‍या गुंडाची जमावाने केली दगडाने ठेचून हत्या !

शहरातील नारायण पेठ परिसरात गुंड विजय वागधरे याच्या सततच्या त्रासाला कंटाळून संतप्त लोकांनी त्याची ७ फेब्रुवारीच्या रात्री दगडाने ठेचून हत्या केली.

मुंबई येथे २ अमली पदार्थ तस्करांना एन्.सी.बी.कडून अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने(एन्.सी.बी) येथील जोगेश्‍वरी परिसरातून इब्राहिम मुजावर उपाख्य इब्राहिम कासकर आणि आसिफ राजकोटवाला या २ अमली पदार्थ तस्करांना ७ फेब्रुवारी या दिवशी अटक केली आहे. एन्.सी.बी.ने या आरोपींकडून चारचाकीही हस्तगत केली आहे.

रोहिंग्या घुसखोरांना बांगलादेशाने थारा न दिल्याने भारतानेही त्यांना सामावून घेऊ नये !- सूर्यकांत केळकर, संस्थापक आणि राष्ट्रीय संघटन मंत्री, भारत रक्षा मंच

बांगलादेशी घुसखोरी विरुद्ध भारत रक्षा मंचाने काम चालू केले. आसाममध्ये एन्.आर्.सी. (राष्ट्रीय नागरिकता नोंदणी प्रक्रिया) च्या प्रक्रियेतील त्रुटी दूर करून सरकारने ती प्रकिया संपूर्ण देशात लागू करावी आणि घुसखोरांना देशातून बाहेर काढावे.

मनपाचे कर्मचारी असल्याचे सांगून ब्रिटीशकालीन वडाचे झाड कापले

महानगरपालिकेचे कर्मचारी असल्याचे सांगून भरदिवसा अपप्रकार करण्याचे धारिष्ट्य करणार्‍यांवर कठोर कारवाई केली, तरच इतरांना जरब बसेल !

प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारच्या प्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याला अटक

एका संवेदनशील प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांनी अटक करणार्‍या पोलिसांची (अ)कार्यक्षमता !

अमेरिकेला सुनवा !

अमेरिकेतील भारतीयांनी भारताची बाजू उचलून धरली पाहिजे; कमीतकमी भारताचा अवमान किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की होणार्‍या गोष्टींना सामाजिक माध्यमांवर निषेधाचा सूर लावायला हवा. अमेरिका ही भारतद्वेषी आणि हिंदुद्वेषी आहे. आक्रमकपणे तिला प्रत्युत्तर देत राहिले, तरच ती ताळ्यावर येईल !