J & K Cow Smuggling : जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोलच्या टँकरमधून गायींची तस्करी

कठुआ (जम्मू-काश्मीर) – सामाजिक माध्यमांतून प्रसारित होणार्‍या एका व्हिडिओमध्ये एका पेट्रोल टँकरमधून गायींची तस्करी होत असल्याचे दिसून आले. हा पेट्रोल टँकर जम्मू-काश्मीर राज्यात नोंदणीकृत आहे. कुणालाही हा सामान्य पेट्रोल टँकर असल्याचे वाटेल; पण त्यातून चक्क अनेक गायींची तस्करी केली जात आहे.

हा टँकर कठुआ येथे आल्यावर स्थानिकांना याची माहिती मिळताच त्यांनी टँकर थांबवला आणि बुलडोझरच्या साहाय्याने टँकर फोडण्यात आला. टँकर फोडताच त्यामध्ये गायींचा कळप आढळला. अनेक गायींना टँकरमध्ये बांधून ठेवण्यात आले होते. या टँकरमध्ये २० ते २५ गायींना डांबून ठेवल्याचा अनुमान आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून टँकरचालकाला अटक करून टँकर जप्त केला.

संपादकीय भूमिका

अशा तस्करांना सरकारने फाशीचीच शिक्षा करण्याची आता आवश्यकता निर्माण झाली आहे !