प्रजासत्ताकदिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारच्या प्रकरणी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याला अटक

एका संवेदनशील प्रकरणातील आरोपीला १४ दिवसांनी अटक करणार्‍या पोलिसांची (अ)कार्यक्षमता ! असे पोलीस आतंकवादी आणि धर्मांध यांच्या विरोधात कठोर कारवाई काय करणार ?


नवी देहली – देहलीच्या सीमेवर आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांनी २६ जानेवारीला प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्च्याच्या वेळी देहली आणि लाल किल्ला येथे झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणी देहली पोलिसांनी पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याला अटक केली आहे. गेल्या १४ दिवसांपासून तो पसार होता. दीप सिद्धू याने शेतकर्‍यांना भडकावल्याचा आरोप ‘भारतीय किसान युनियन’चे हरियाणातील प्रमुख गुरनामसिंह चाडूनी यांनी केला होता.

‘शेतकर्‍यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती’, असे चाडूनी यांनी घटनेनंतर म्हटले होते. दीप सिद्धू याचे नाव भाजपासमवेत जोडण्यात आले होते. तसेच या हिंसाचारामागे भाजप असल्याचा आरोप शिवसेनेसह विरोधी पक्षांनी केला होता.