Jharkhand Congress Freebies To Infiltrators : झारखंडमध्ये सत्तेवर आल्यास घुसखोरांना गॅस सिलिंडर देऊ !

काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर यांचे आश्‍वासन !

काँग्रेस नेते गुलाम अहमद मीर

बोकारो (झारखंड) – झारखंड विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेसचे झारखंड प्रसाराचे दायित्व असणारे गुलाम अहमद मीर यांनी त्यांचे सरकार आल्यावर घुसखोरांनाही गॅस सिलिंडर देऊ, अशी घोषणा केली.

घुसखोरांविषयी भाजपवर टीका करतांना मीर म्हणाले की, भाजपचा नारा आहे की, ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागले जाल, तर कापले जाल), तर आमचा नारा लोकांना जोडण्याचा आहे. काँग्रेस आणि आमच्या आघाडीच्या नेत्यांचा नेहमीच लोकांना जोडण्यावर विश्‍वास आहे. सत्तेत आल्यावर लोकांना गॅस सिलिंडर देतांना आम्ही हिंदु, मुसलमान किंवा घुसखोर, असे पहाणार नाही. (यापेक्षा संतापजनक वक्तव्य ते कोणते ? – संपादक)

संपादकीय भूमिका

  • आतापर्यंत काँग्रेस हेच करत आली असून तेच ती आता जाहीररित्या सांगत आहे. अशा राष्ट्रघातकींना झारखंडची जनता सत्तेवर कधीतरी बसवेल का ?
  • या विधानावरून मीर यांच्या विरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे !