|
(ईडी, म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट म्हणजे अंमलबजावणी संचालनालय)
मुंबई – मालेगाव येथील एका व्यापार्याने निवडणुकीतील प्रचारासाठी पैशांचा गैरवापर केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ‘ईडी’ने १३ नोव्हेंबर या दिवशी ठाणे, वाशी, मालेगाव, नाशिक, सूरत आणि कर्णावती येथे धाडी घातल्या. या धाडी व्यापारी आणि बनावट आस्थापनांशी संबंधित ठिकाणांवर घालण्यात आल्या. या प्रकरणात बँक खात्यांच्या माध्यमातून १२५ कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडी अधिक अन्वेषण करत आहे.
१. मालेगाव येथील सिराज अहमद हॅरुन मेमनने एकापेक्षा अधिक बँक खाती उघडल्यानंतर या धाडी घालण्यात आल्या. मेमनला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती.
२. सिराजच्या २४ निनावी बँक खात्यांसह मालेगाव आणि नाशिक येथील दोन बँकांमध्ये पोलीस, ईडी, प्राप्तीकर विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि निवडणूक आयोग अन्वेषण करत आहेत, असे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ‘एक्स’वर पोस्ट केले आहे.
३. ‘ईडी’ने या खात्यांमधील व्यवहारांची माहिती घेतली, तेव्हा त्यात १२५ कोटी रुपयांचे व्यवहार आढळले. निवडणुकीसाठी या रकमेचा वापर होत असल्याचा आरोप आहे.
संपादकीय भूमिकादेशात अल्पसंख्य असणारे शेकडो कोटी रुपयांचा गैरवापर करण्यासारख्या गुन्ह्यांत मात्र बहुसंख्य असतात, हे जाणा ! |