ठाणे – जे स्वतःला लोकांपेक्षा मोठे समजतात, भगवान, ईश्वर, अल्ला यांच्यापेक्षाही मोठे समजतात, त्यांना त्यांची जागा दाखवायची हीच योग्य वेळ आहे. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघामध्ये गुरु-शिष्याची नव्हे, तर सत्य-असत्य, धर्म -अधर्म यांची लढाई आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नजीब मुल्ला यांची ही लढाई लढण्यासाठी मी अर्जुन होऊन आलो आहे, असे विधान राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंब्रा येथील सभेत बोलतांना केले. या वेळी त्यांनी ‘जितेंद्र आव्हाड दुतोंडी आहे’, अशी टीकाही केली.