सोनिया गांधी निवडून गेल्यावर जनतेला भेटत नाहीत ! – काँग्रेसच्याच आमदार अदिती सिंह यांची टीका

 हा आहे काँग्रेसच्या अध्यक्षांचा कृतघ्नपणा ! काँग्रेसच्या गांधी घराण्याने जितकी वर्षे देशावर राज्य केले तितकी वर्षे जनतेसाठी आणि देशासाठी काहीही केले नाही, हीच वस्तूस्थिती आहे !

रायबरेली (उत्तरप्रदेश) – जर जनता तुम्हाला मतदान करून निवडणून देते, तर तुम्ही त्या जनतेला सर्व प्रकारे साहाय्य केले पाहिजे. जनतेला भेटले पाहिजे; मात्र येथून निवडून आलेल्या सोनिया गांधी गेल्या ५ वर्षांत केवळ २ वेळा येथे आल्या आहेत. त्यातही एकदा निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी आल्या होत्या, अशी टीका काँग्रेसच्याच येथील आमदार अदिती सिंह यांनी केली आहे.