अमेरिकेचे प्रसिद्ध गुंतवणूकदार मार्क मोबियस यांचे विधान
वॉशिंग्टन (अमेरिका) – पंतप्रधान मोदी नोबेल शांतता या जागतिक पुरस्कारास पात्र आहेत. त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा, अशी मागणी अमेरिकेचे प्रसिद्ध गुंतवणूकदार मार्क मोबियस यांनी केली आहे.
८८ वर्षीय मोबियस म्हणाले की, अशांत जगात पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेषतः मध्य-पूर्व आणि रशिया-युक्रेन संघर्षांत शांतता प्रस्थापित करू शकतात. पंतप्रधान मोदी एक उत्तम नेते आणि एक चांगले माणूस आहेत. मला वाटते की, आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या भूमिकेचे महत्त्व वेगाने वाढणार आहे. सर्व राजकीय पक्षांशी बोलण्याची क्षमता त्यांच्यात आहे. आगामी काळात पंतप्रधान मोदी हे जगातील एक महत्त्वाचे शांतीदूत बनू शकतात.
मोबियस पुढे म्हणाले की, भारतामध्ये सर्व देशांशी तटस्थ रहाण्याची क्षमता आहे. भारताची ही क्षमता त्याला जागतिक स्तरावर शांततेसाठी मध्यस्थ होण्यास योग्य बनवते. पंतप्रधान मोदी आज जगात एक प्रमुख मध्यस्थ होण्यासाठी अत्यंत पात्र आहेत.