भ्रष्टाचाराने पोखरलेली राजकीय व्यवस्था कधी सुधारणार ?
नांदेड – रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार सेवकाचे मानधन बँक खात्यात जमा करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील दुधड वाळकेवाडी येथील उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर पोलीस ठाण्यात चालू आहे. त्या दोघांनी २५ सहस्र रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. कोणत्याही लोकसेवकाने, शासकीय अधिकारी, तसेच कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी इसम (एजंट) यांनी शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त अन्य रकमेच्या लाचेची मागणी केल्यास टोल फ्री क्रमांकावर किंवा दूरभाष क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना केले आहे.