मथुरेतील गोवर्धन पर्वतावरचे दगड ऑनलाईन विकणार्‍या तिघांना अटक

देशातील कोणत्या गोष्टीचा व्यापार केला जाईल, याचा नेम नाही, हेच यातून लक्षात येते ! हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते अशा अयोग्य कृती करून पाप करत आहेत !

गोवर्धन पर्वत

नवी देहली – देहली पोलिसांनी धार्मिक महत्त्व असलेल्या उत्तरप्रदेशातील मथुरा येथील गोवर्धन पर्वतावरचे दगड ऑनलाईन विकणार्‍या ३ जणांना अटक केली. या प्रकरणात ‘इंडिया मार्ट’चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश अग्रवाल, सहसंस्थापक ब्रजेश अग्रवाल आणि मथुरा येथील पुरवठादार अंकुर अग्रवाल यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम २६५ आणि कलम ६६ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. संकेतस्थळावर दावा केला जात आहे की, हे दगड नैसर्गिक आहेत. एका दगडाची किंमत ५ सहस्र १७५ रुपये सांगितली जात होती.

१. मथुरा येथील सामाजिक कार्यकर्ते केशव मुखिया यांच्या तक्रारीवरून गोवर्धन पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात आणखी १० तक्रारी या पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आल्या असून त्यांची एकत्रित चौकशी केली जात आहे.

२. या प्रकरणी शेकडो लोकांनी गोवर्धन पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. मथुरा येथील संत सिया राम बाबा यांनी म्हटले की, गोवर्धन पर्वत स्वतः श्रीकृष्ण आहेत. गोवर्धनशी संबंधित कोणताही व्यवसाय करणार्‍या व्यक्तीला तो देवतांचा अपमान करत असल्याचे समजले जाईल.