पाकिस्तानमध्ये पेट्रोल आणि डिझेल यांच्या किमतीत १९ रुपयांनी वाढ
पाकिस्तान सरकारने देशातील डिझेल आणि पेट्रोल यांच्या दरात १९ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे येथे पेट्रोलचा दर २७२.९५ रुपये आणि डिझेलचा दर २७३.४० रुपये प्रतिलिटर झाला आहे.
पाकिस्तान सरकारने देशातील डिझेल आणि पेट्रोल यांच्या दरात १९ रुपयांनी वाढ केली आहे. त्यामुळे येथे पेट्रोलचा दर २७२.९५ रुपये आणि डिझेलचा दर २७३.४० रुपये प्रतिलिटर झाला आहे.
दिवाळखोर होण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणार्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अटी मान्य करण्यासाठी संसदेत एक विधेयक संमत केले आहे. नाणेनिधीच्या अटींचे पालन केले, तर पाकला सुमारे ९ सहस्र कोटी रुपयांचे कर्ज मिळणार आहे.
येत्या काळात महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. २२ सप्टेंबर या दिवशी शेअरबाजार चालू झाल्यावर भारतीय रुपयाचे मोठ्या प्रमाणात अवमूल्यन झाले. येणार्या काळात एका अमेरिकी डॉलरसाठी ८०.२८ रुपये मोजावे लागणार आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल १२४ डॉलर झाली आहे, तसेच डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने भारतात पेट्रोल-डिझेल यांच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आस्थापनांकडून पेट्रोल-डिझेलचा पुरवठा अनियमित होत असल्यामुळे त्याचा निषेध म्हणून डिलर्सनी केवळ १ दिवस इंधन खरेदी बंद ठेवली आहे. याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने ७ दिवस चर्चा केल्यानंतर पाकला ६ अब्ज डॉलर्सचे कर्ज देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पाक सरकारने नाणेनिधीच्या सांगण्यावरून पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरात प्रति लिटर ३० रुपयांनी (पाकिस्तानी रुपये) वाढ केली आहे.
श्रीलंकेत पेट्रोल ४२० रुपये, तर डिझेल ४०० रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. श्रीलंकेत १९ एप्रिलनंतर इंधनाच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. श्रीलंकेवर आर्थिक संकट ओढवले असून महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेल यांवरील अबकारी करात कपात केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी याविषयी माहिती देतांना सांगितले की, आम्ही पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर ८ रुपयांनी आणि डिझेलवर प्रति लिटर ६ रुपयांनी अल्प करत आहोत.
मंत्रीमंडळाच्या बैठकीत पेट्रोलच्या किमती अल्प करण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नाही, अशी माहिती राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. राज्यातील पेट्रोलवरील कर अल्प करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जाणार असल्याची चर्चा होती; मात्र प्रत्यक्षात यावर कोणतीही चर्चा झाली नाही.
सद्य:स्थितीत मुंबईत १ लिटर डिझेलच्या दरामध्ये २४.३८ पैसे केंद्राचा, तर २२.३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१.५८ पैसे केंद्रीय कर, तर ३२.५५ पैसे राज्याचा कर आहे. राज्यामुळे पेट्रोल आणि डिझेल महागले आहे, ही वस्तूस्थिती नाही, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.