रामाच्या देशात पेट्रोल महाग, तर सीता आणि रावण यांच्या देशात स्वस्त ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

नवी दिल्ली – रामाच्या भारतात पेट्रोलचा दर ९३ रुपये प्रति लिटर, सीतेच्या नेपाळमध्ये पेट्रोलचा दर ५३ रुपये प्रति लिटर, तर रावणाच्या लंकेत पेट्रोलचा दर ५१ रुपये प्रति लिटर आहे, असे ट्वीट भाजपचे वरिष्ठ नेते आणि खासदार डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरवाढीवरून केले आहे.

त्यांनी यापूर्वीही पेट्रोल दर वाढीवरून केंद्र सरकारवर टीका केली आहे.