कळंबा कारागृहातील पोलीस शिपायाकडून बंदीवानांच्या नातेवाइकांकडे २५ सहस्र रुपयांची मागणी

  • कारागृह प्रशासनाचा भ्रष्ट कारभार !
  • अशा भ्रष्ट पोलिसांचा भरणा असलेले पोलीसदल कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ? आता पोलीसदलातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी या क्षेत्रात ‘स्वच्छता अभियान’ राबवणे आवश्यक !

कोल्हापूर – कळंबा कारागृहातील पोलीस शिपाई किसन बिरलिंगे यांच्या बुटाच्या मोज्यांमध्ये २ चिठ्ठ्या सापडल्या. त्यातील लिखाणावरून त्यांनी बंदीवानांच्या नातेवाइकांकडे २५ सहस्र रुपयांची मागणी केल्याचे उघड झाले. (अशा भ्रष्टाचारी पोलिसांवर वेळीच कठोर कारवाई केली, तर इतर कर्मचार्‍यांना जरब बसेल ! – संपादक) या प्रकरणी बिरलिंगे यांची चौकशी करून त्याविषयीचा अहवाल वरिष्ठ अधिकार्‍यांकडे पाठवला आहे.

या चिठ्ठीत ‘माझे तातडीचे काम आहे. त्यासाठी चिठ्ठी घेऊन येणार्‍या व्यक्तीकडे २५ सहस्र रुपये देण्यात यावेत’, असे लिहून काही बंदीवानांची नावे चिठ्ठीमध्ये लिहिली आहेत.

(सौजन्य : Zee 24 Taas)

किसन बिरलिंगे या पोलीस शिपायाचे ‘रेकॉर्ड’ अतिशय खराब आहे. चिठ्ठीमध्ये लिहिलेल्या बंदीवानांची चौकशी केल्यावर त्यांनी अशा प्रकारची कोणतीही चिठ्ठी लिहिली नसल्याचे आढळले. याआधी कळंबा कारागृहामध्ये भ्रमणभाष, सीम कार्ड, चार्जर, गांजा आढळला होता. (अनाचारी कृत्याचा अड्डा बनलेले कारागृह ! अशा कारागृहांमध्ये जाऊन गुन्हेगारांमध्ये कधी तरी पालट होईल का ? – संपादक)