६ फेब्रुवारीला देशभर रस्ता बंद आंदोलन ! – किसान मोर्चाची घोषणा

असे बंदचे आयोजन करून जनतेला वेठीस धरणार्‍या संघटना आणि त्यांचे नेते यांच्यावर कारवाई आवश्यक !

किसान संघटनांची पत्रकार परिषद

नवी देहली – किसान मोर्चाकडून ६ फेब्रुवारीला देशभरात रस्ता बंद आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

दुपारी १२ ते ३ या वेळेत हे आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय किसान युनियनचे नेते बलबीर सिंह यांनी ही घोषणा केली.