जलालाबाद (पंजाब) येथे शिरोमणी अकाली दल आणि काँग्रेस यांच्यात हिंसाचार !

सुखबीरसिंह बादल यांच्या वाहनाची तोडफोड

काँग्रेसच्या राज्यात काँग्रेसींची गुंडगिरी ! असा पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देईल का ?

जलालाबाद (पंजाब) – येथे स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याच्या वेळी काँग्रेस आणि शिरोमणी अकाली दल यांच्या कार्यकर्त्यांत जोरदार दगडफेक आणि लाठीमार झाला. या वेळी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंह बादल यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. यात या गाडीची मोठ्या प्रमाणात हानी झाली.

सुखबीरसिंह बादल

सुखबीरसिंह बादल यांना वाचवण्यासाठी पुढे आलेल्या ३ कार्यकर्त्यांना गोळ्या लागल्या असल्याची माहितीही अकाली दलाने दिली आहे. तसेच ‘काँग्रेसच्या आक्रमणकर्त्या कार्यकर्त्यांच्या विरोधात कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत’, असा आरोपही अकाली दलाने केला आहे.