पाकच्या सिंध प्रांतातील अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांचे रक्षण करा ! – अमेरिकेतील सिंधी संघटनेची मागणी

अमेरिकेतील सिंधी संघटनेची राष्ट्रपती जो बायडेन यांच्याकडे मागणी

सिंधी संघटना बहुसंख्य हिंदूंचा देश असणार्‍या भारताकडे साहाय्य मागत नाही, तर अमेरिकेकडे साहाय्य मागते ! यावरून ‘भारत पीडित हिंदूंसाठी काहीही करणार नाही, हे जगभरातील हिंदूंच्याही लक्षात आले आहे’, असे समजायचे का ?

वॉशिंग्टन – अमेरिकेतील सिंधी-अमेरिकी संघटना ‘सिंधी फाऊंडेशन’चे कार्यकारी संचालक मुनवर लाघरी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन यांना आवाहन केले आहे की, त्यांना पाकच्या सिंध प्रांतातील धार्मिक अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकारांचे होणारे उल्लंघन आणि पर्यावरणीय हानी यांवर तोडगा काढावा.

मुनवर लाघरी

मुनवर लाघरी यांनी जो बायडेन यांना लिहिलेल्या पत्रात, ‘प्रतिदिन येथे लोक गायब होत आहेत. त्यांच्या हत्या केल्या जात आहेत. अल्पसंख्यांकांचे धर्मांतर केल्याच्या घटना वाढल्या आहेत. या घटना रोखून त्यांचा रक्षण करावे’, अशी मागणी केली आहे.

मुनवर लाघरी यांनी लिहिलेले पत्र वाचण्यासाठी चित्रावर क्लिक करा –