बँकेचा विलिनीकरणाचा प्रस्ताव मार्गी लावावा !

रूपी बँक ठेवीदार हक्क समितीकडून यापूर्वीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत रिझर्व्ह बँकेला याविषयीची भूमिका मांडावी लागणार आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका मुख्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस अन् शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन ! 

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका मुख्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

शेतकर्‍यांनीच त्यांच्या हत्येचा कट रचल्याची स्वीकृती देण्यास सांगितले !

शेतकर्‍यांच्या आंदोलनात खलिस्तानवादी आणि भारतविरोधी घटक सहभागी झाल्याचे समोर येत आहे. सरकारची आणि त्याहून अधिक देशाची अपकीर्ती होण्यासाठी असे षड्यंत्र रचले गेले होते का, याची सखोल चौकशी होऊन सत्य समोर येणे आवश्यक !

चीनकडून भारताच्या विश्वासाला तडा ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

भारत पुनःपुन्हा त्याच्यावर विश्‍वास कसा ठेवू शकतो ? ‘चीनवर विश्‍वास ठेवणे, हा आत्मघात असून त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे’, असेच भारतियांना शासनकर्त्यांकडून अपेक्षित आहे !

तमिळनाडूमध्ये प्राचीन मंदिरांच्या भिंतींवर क्रॉस रेखाटून त्याला चर्चचे स्वरूप देण्याचा प्रयत्न !

तमिळनाडूत अण्णाद्रमुकच्या जयललिता मुख्यमंत्री असतांना खोट्या आरोपांखाली शंकराचार्य यांना अटक करून त्यांना कारागृहात डांबण्यात आले. आज त्याच पक्षाचे सरकार सत्तेत असतांना तेथे हिंदुविरोधी कारवायांमध्ये वाढ झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

मुंबईत अमली पदार्थांची विक्री करून हवालामार्गे आतंकवाद्यांना पैसा पुरवला जातो

मुंबईत अमली पदार्थांची विक्री होवून आतंकवाद्यांना पैसा जात असेल, तर पोलिसांनी हे लक्षात का आले नाही ? ही पोलिसांची निष्क्रियता नव्हे का ?

भुरट्या चोरांना मार्गावर आणण्यासाठी मुंबई पोलिसांची आरोपी दत्तक योजना !

गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरत असल्याने त्यांना अशा योजना राबवाव्या लागत आहेत. त्यामुळे या योजनेच्या अंतर्गत आरोपींना देण्यात येणारी रक्कम पोलिसांच्या खिशातून द्यायला हवी ! इथेही पोलिसांनी भ्रष्टाचार केला तर . . . !

ब्राझिलच्या राष्ट्रपतींनी श्री हनुमानाचे चित्र पोस्ट करून मानले भारताचे आभार !

विदेशातील ख्रिस्ती राष्ट्रपतींनाही श्री हनुमानाचे महत्त्व ठाऊक आहे आणि त्याविषयी आदरही वाटतो, तसेच ते भारताकडे हिंदु राष्ट्र म्हणून पहातात, हेच यातून दिसून येते. ही भारतातील बुद्धीप्रामाण्यावाद्यांना चपराकच होय !

‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाषण करण्यास नकार !

स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणणार्‍या ममता(बानो) बॅनर्जी यांना मुसलमानांचे लांगूलचालन केलेले चालते; मात्र श्रीरामाचा जयजयकार चालत नाही. यातून त्यांचा हिंदुद्वेष दिसून येतो !

ईशनिंदाविरोधी कायदा बनवून श्रद्धास्थानांचा होणारा अवमान रोखण्यासाठी कठोर कायदा करा !

आज नाटके, चित्रपट, वेब सिरीज, विज्ञापने, काव्ये, चित्रे आदींद्वारे धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत आणि राष्ट्रपुरुष यांचे मोठ्या प्रमाणात विडंबन केले जात आहे. देवतांची विटंबना करणार्‍यांवर वचक बसावा यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता आहे.