चीनकडून भारताच्या विश्वासाला तडा ! – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह  

‘चीन विश्‍वासू नाही’, हे काही दशकांपूर्वीच स्पष्ट झाले असतांना भारत पुनःपुन्हा त्याच्यावर विश्‍वास कसा ठेवू शकतो ? ‘चीनवर विश्‍वास ठेवणे, हा आत्मघात असून त्याला समजेल, अशाच भाषेत उत्तर देणे आवश्यक आहे’, असेच भारतियांना शासनकर्त्यांकडून अपेक्षित आहे !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

नवी देहली – चीन जोपर्यंत त्याच्या सैनिकांची संख्या अल्प करणार नाही तोपर्यंत भारतही स्वतःच्या सैनिकांची संख्या अल्प करणार नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.

‘चीनने भारताच्या विश्‍वासाला तडा दिला आहे का ?’ या प्रश्‍नावर राजनाथ सिंह म्हणाले, ‘‘यात कोणतीही शंका नाही. भारत-चीन यांच्यातील वादावर चर्चेतून तोडगा काढता येऊ शकतो.’’

(सौजन्य : TV9 Bharatvarsh)

राजनाथ सिंह म्हणाले की, भारत स्वतःच्या सीमाक्षेत्रात गतीने पायाभूत सुविधांचा विकास करत आहे आणि चीनने काही योजनांवर आक्षेपही घेतला आहे.