भारतीय वैज्ञानिकांचे संशोधन
लंडन (इंग्लंड) – कोरोनाकाळात लाखो लोकांचा मृत्यू झाला. त्या काळात जगभरात दळणवळण बंदी होती. तिचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवरही विपरीत परिणाम झाला. या कालावधीत पृथ्वीवरील तापमान, तसेच प्रदूषण यांत घट नोंदवली गेली. त्याचा प्रभाव हा चंद्रापर्यंत झाल्याचा दावा भारतीय वैज्ञानिकांनी केला आहे. ‘रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटी’मध्ये प्रकाशित केलेल्या अहवालात कोरोनाच्या काळात मुख्यत्वे एप्रिल-मे २०२० मधील कडक दळणवळण बंदीच्या कालावधीत चंद्राच्या पृष्ठभागाच्या तापमानात ८ ते १० अंशांची घट दिसून आली.
सौजन्य : Mirror Now
१. गुजरातमधील ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’चे दुर्गा प्रसाद आणि जी. अम्बिली या वैज्ञानिकांनी वर्ष २०१७ ते २०२३ या कालावधीत चंद्रावरील ६ वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या पृष्ठभागाच्या तापमानाचे विश्लेषण केले.
२. यासंदर्भातील माहिती देतांना संस्थेचे संचालक अनिल भारद्वाज यांनी सांगितले की, त्यांच्या वैज्ञानिकांच्या पथकाने अतिशय महत्त्वाचे काम केले आहे. हे एक वेगळे संशोधन आहे.
३. या संशोधनासाठी नासाच्या ‘लुनार रीकोनिसन्स ऑर्बिटर’चे साहाय्य घेण्यात आले.