Himanta Biswa Sarma Slams INDI Alliance : आतंकवादी हिंदु नागरिक किंवा हिंदु सैनिक यांना मारतात, तेव्हा विरोधी पक्षांच्या ‘इंडि’ आघाडीवाल्यांना वाईट वाटत नाही !

आतंकवादी नसरूल्लाच्या मृत्यूवर दुःख व्यक्त करणार्‍यांवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांची टीका

(डावीकडून) आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा मेहबूबा मुफ्ती आणि राहुल गांधी

सोनीपत (हरियाणा) – नुकतेच इस्रायली सैन्याने आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरूल्ला याला ठार मारले. एखाद्याला कुठेही मारणे, ही त्यांच्या देशांर्गत गोष्ट असून त्याविषयी आपल्याला काहीही बोलण्याची आवश्यकता नाही; मात्र काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्ती सांगत आहेत की, ‘नसरूल्लाच्या मृत्यूमुळे आम्ही दु:खी आहोत; म्हणून आम्ही प्रचार करणार नाही.’ मेहबूबा मुफ्ती, फारुख अब्दुल्ला आणि राहुल गांधी या इंडि आघाडीवाल्यांना मला विचारायचे आहे की, जेव्हा एखादा हिंदु आतंकवाद्यांच्या आक्रमणात मरतो किंवा आतंकवादी जेव्हा हिंदु सैनिकांना मारतात, तेव्हा तुम्हाला वाईट वाटते का ? असा प्रश्‍न भाजपचे नेते तथा आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी येथे निवडणूक प्रसारसभेत बोलतांना उपस्थित केला.

भाजपचे प्रवक्ते आणि जम्मू-काश्मीरचे माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता म्हणाले की, नसरूल्लाच्या मृत्यूमुळे मेहबूबा मुफ्ती यांना एवढ्या वेदना का होत आहेत ? यामागचा हेतू लोकांना ठाऊक आहे. बांगलादेशात हिंदूंची हत्या होत असतांना त्या एक शब्दही बोलल्या नाहीत. त्यावर मेहबूबा मुफ्ती यांनी अश्रू ढाळले नाहीत.

संपादकीय भूमिका

नसरूल्लाच्या मृत्यूवर दुःख करणार्‍यांना लेबनॉनमध्ये पाठवा, अशी कुणी मागणी केली, तर चुकीची ठरू नये !