|
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – इस्रायलने लेबनॉनची राजधानी बेरूत येथे हिजबुल्ला या जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरूल्ला याला ठार मारल्याचा निषेध म्हणून लक्ष्मणपुरी येथे १० सहस्र मुसलमानांनी २९ सप्टेंबरच्या रात्री १ किलोमीटर मेणबत्ती मोर्चा काढला. तसेच या मुसलमानांनी घरांवर काळे झेंडे लावले होते. मोर्च्यामध्ये मुसलमानांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे छायाचित्र जाळले आणि ‘हसन नसरूल्ला झिंदाबाद’, ‘अमेरिकेला आग लावा’ अशी घोषणाबाजी केली. येथील शिया मुसलमानांनी ३ दिवसांचा दुखवटा घोषित केला आहे. या काळात बडा इमामबाडा ते छोटा इमामबाडा या भागातील ३०० दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. उत्तरप्रदेशातील सुलतानपूरमध्येही शिया मुसलमानांनी निदर्शने केली. नसरूल्ला इस्रायलच्या मार्गातील अडथळा होता. निष्पापांचे रक्त सांडल्यामुळे इस्रायलने नसरूल्लाला ठार मारले.
10,000 Shia Mu$l!m$ take out a candle light procession in Laxmanpuri (Uttar Pradesh)
It was carried out as a condolence on the death of the slain Nasrallah, the head of the jih@d! terrorist organization Hezbollah.
More than 300 shops were closed.
‘Terrorism has a religion and… pic.twitter.com/MDbFBzfYeW
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 30, 2024
एका मुसलमान व्यापार्याने सांगितले की, आपल्या भावनांपेक्षा व्यवसाय महत्त्वाचा नाही. सत्याचे समर्थन करण्यासाठी आम्ही कोणतेही मूल्य मोजण्यास सिद्ध आहोत.
‘हुसैनी टायगर्स’ संघटनेचे सदस्य जरी झैदी म्हणाले की, आमच्यासाठी हा फार कठीण काळ आहे. असे वाटते की, आम्ही आमच्या कुटुंबातील एक सदस्य गमावला आहे. ज्याप्रमाणे आपण आपल्या घरी मृत्यूनंतर शोक व्यक्त करतो, तसे दु:ख आम्हाला झाले आहे. इस्रायलवर कठोर कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
‘हिजबुल्ला’ ही शिया मुसलमानांची आतंकवादी संघटना !‘ हिजबुल्ला’ ही आतंकवादी संघटना शिया मुसलमानांची असून तिला सुन्नी मुसलमान पाठिंबा देत नाहीत. जगात बहुतेक सुन्नी मुसलमानांच्या आतंकवादी संघटना आहेत आणि त्यांना सुन्नी मुसलमान पाठिंबा देतात. पाकिस्तानातील आतंकवादी संघटना सुन्नी मुसलमानांच्या आहेत. गाझामधील ‘हमास’ ही सुन्नी मुसलमानांची आतंकवादी संघटना असल्याने तिला अधिक समर्थन मिळते. त्या तुलनेत हिजबुल्लाला समर्थन मिळत नाही; मात्र हीच हिजबुल्ला हमासला साहाय्य करत होती. हिजबुल्लाला शिया मुसलमानांचा देश असणारा इराण साहाय्य करतो. |
संपादकीय भूमिका
|